---Advertisement---

थेट धोनीबरोबर केले झिवाने पदार्पण, परंतू क्रिकेट नाही तर जाहीरातीच्या पिचवर

On: मंगळवार, जानेवारी 5, 2021 11:52 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटर व त्यांची मुले नेहमीच चर्चेत असतात .रोहन गावसकरपासून ते अर्जुन तेंडुलकरपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटरांची मुले कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत मीडियाच्या आकर्षणाचा केंद्र ठरत होती. या स्टार किड्समध्ये आता एक नवीन नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची मुलगी जीवा धोनीचे.

जीवाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असतात. ज्यात ती कधी वडिलांना चीयर करताना दिसते, तर कधी डान्स करताना. याच दरम्यान बातमी समोर येत आहे की जीवा आपल्या वडिलांसोबत ओरिओ बिस्कीटच्या जाहिरातीमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे जीवाचे अभिनय क्षेत्रातील हे पहिलेच पाऊल असणार आहे.

https://www.instagram.com/p/CJdlHDXq0vC/

महेंद्रसिंग धोनी मुलगी जीवा सोबत ओरिओ बिस्कीट साठी एक ऍड शूट करणार आहे. ओरिओने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर माही व जिवाचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कॅप्शन लिहले ,” बघा खेळासाठी मैदानात कोणाची एन्ट्री झाली आहे. 2021 मध्ये थोड्या मस्ती साठी ओरिओ सोबत जोडलेले रहा “. या पोस्टमध्ये ओरिओने धोनी व जीवाला देखील टॅग केलेले आहे.

https://www.instagram.com/p/CJocjPDJejQ/

तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की जीवाचे इंस्टाग्रामवर अकाउंट असून, तिचे तब्बल 18 लाख फॉलोअर्स आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---