---Advertisement---

पंडित महेंद्रसिंग धोनी! सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय थालाचा नवा लूक

On: बुधवार, ऑगस्ट 10, 2022 11:17 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तब्बल सतरा वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीनंतर २०२० मध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, तो अद्यापही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळतो. वयाची चाळीशी पार केलेला धोनी हा आजही मार्केटमधील ब्रँडसाठी पहिली पसंती आहे. त्याच्या याच आणखी एका जाहिरातीसाठी त्याचा एक नवा लूक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

धोनी ज्या लूकमूळे चर्चेत आहे तो लूक एका पंडिताचा आहे. हा लूक त्याच्या एका आगामी जाहिरातीसाठी असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल झालेल्या लूकमध्ये धोनी पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसतोय. तसेच त्याच्या हातामध्ये माळ देखील दिसून येतेय. सोशल मीडियावर त्याच्या या लूकची चर्चा होतेय.

https://www.instagram.com/p/ChCzW7IvPwz/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

धोनी सध्या केवळ आयपीएल मध्ये सहभागी होत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून तो सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येत असतो. नुकतेच त्याने भारतीय सैन्यासोबत काही दिवस घालवले होते. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी२० लीगमध्ये तो जोहान्सबर्ग सुपर किंग्स संघाचा मेंटर बनू शकतो, अशी देखील शक्यता आहे. धोनी आत्ता गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असल्याचे काही दिवसांपूर्वी दिसून आले होते. त्यामुळेच तो एका ग्रामीण वैद्याकडून उपचार घेताना दिसलेला. ‌

धोनी आयपीएल २०२३ मध्ये अखेरच्या वेळी खेळताना दिसू शकतो. ४१ वर्षाच्या धोनीने यापूर्वी सांगितले होते की, आपल्याला आपला अखेरचा आयपीएल सामना चेन्नईच्या मैदानावर खेळायला आवडेल. मागील दोन आयपीएल युएईत झाल्याने त्याला चेन्नईच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

अश्विनला आशिया कपसाठी निवडल्याने संतापला भारतीय दिग्गज; म्हणाला, “दरवेळी त्याला…”

सिकंदर रजाचे छातीठोक सेलिब्रेशन! शतकी खेळीच्या जोरावर संघाला मिळवून दिला विजय

 

 

रोहित-द्रविड जोडगोळीमुळे फळफळलंय ‘या’ सिनीयर खेळाडूंचं नशीब, एकटा ३ वर्षांपासून होता बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---