लीड्स। मंगळवारी (17 जुलै) पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना इंग्लंडने 8 विकेटने जिंकली. त्यामुळे इंग्लंडने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेवरही 2-1 ने कब्जा केला.
या संपूर्ण मालिकेत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीवर धीम्या फलंदाजीसाठी टिका होत असली तरी त्याच्या यष्टीरक्षणाचे मात्र कौतुक होत आहे.
तिसऱ्या वनडे सामन्यातही धोनीची यष्टीमागील उत्कृष्ट कामगिरी सर्वांना पहायला मिळाली.
या सामन्यात भारताला फक्त जॉनी बेअरस्टो आणि जेम्स व्हिन्स या इंग्लंडच्या दोन फलंदाजांच्या विकेट घेण्यात यश आले होते. त्यातील व्हिन्स तर धावबाद झाला. त्याला धावबाद करण्यासाठी जरी हार्दिक पंड्याचे नाव लागले असले तरी त्यात धोनीचा मोलाचा वाटा होता.
झाले असे की सामन्याच्या दुसऱ्या डावात 9 व्या षटकात रुटने युजवेंद्र चहलने टाकलेल्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचवेळी मिड विकेटला असलेल्या हार्दिकने चेंडू पकडला आणि स्टंपच्या दिशेने फेकला. हा चेंडू बाहेर जात असल्याने यष्टीमागे उभ्या धोनीने चातुर्याने त्या चेंडूला हाताने दिशा दिशा दिली. त्यामुळे व्हिन्स धावबाद झाला.
https://twitter.com/cricketislv/status/1019263845523738625
त्याचबरोबर 35 व्या षटकातही धोनीने जलद गतीने जो रुटला 69 धावांवर असताना यष्टीचीत केले होते. मात्र चहलने नो बॉल टाकल्याने रुटला जीवदान मिळाले. या जीवदानाचा फायदा घेत रुटने या सामन्यात शतक केले.
धोनीने या मालिकेत यष्टीमागे 300 झेल घेण्याचाही पराक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–नेल्सन मंडेलांच्या 100व्या जन्मदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टरने व्यक्त केल्या भावना
–आयसीसी वनडे क्रमवारी जाहिर; कुलदीप यादवची गोलंदाजी क्रमवारीत मोठी झेप
–धोनीच्या या कृत्यांमुळे, निवृत्तीच्या चर्चेने धरला जोर