भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिका संपल्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी इंग्लंड दौऱ्यावरुन भारतात परतला आहे.
त्यामुळे धोनी सध्या माजी केंद्रिय मंत्री प्रफुल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेलच्या लग्नसमारंभात सहभागी झाला आहे. त्याचबरोबर या लग्नसोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली आहे.
या लग्नसोहळ्या दरम्यानचा धोनीचा बाथरुममधील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे.
हा व्हिडिओ गायक राहुल वैद्यने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात धोनी वॉशबेसिनच्या जवळ बसला आहे. यावेळी राहुल वैद्य धोनीला म्हणाला, ‘एक व्यक्ती असा आहे जो नेहेमी शांत असतो आणि तो तू आहे.’
यावेळी धोनीने त्यालाच प्रश्न विचारला बाथरुममध्ये? तर त्यावर राहुलने हो असे उत्तर दिले.. त्यानंतर धोनी इकडे तिकडे पाहू लागला. तसेच राहुलने या व्हिडिओच्या शेवटी म्हटले आहे की हा आमचा बाथरुम ब्रेक होता.
या व्हिडिओला कॅप्शन देताना राहुलने लिहिले आहे की, ‘कोणीतरी इतके शांत आणि विनम्र कसे असू शकते? धोनीकडून शिकण्यासाठी खूप काही आहे.’
https://www.instagram.com/p/BldQdIkFNDr/?taken-by=rahulvaidyarkv
या लग्नसोहळ्यासाठी धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह उपस्थित आहे. तसेच या सोहळ्यातील झिवाच्या डान्सचाही व्हिडिओ चांगलाच वायरल झाला आहे.
धोनीबरोबरच या समारंभात झहिर खान, आरपी सिंग, पार्थिव पटेल आणि इरफान पठाण हे क्रिकेटपटू देखील उपस्थित होते.
धोनीने नुकत्याच केलेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याला काही विशेष करता आलेले नाही. त्याला त्याच्या संथ खेळण्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे.
भारतीय संघ 1 आॅगस्टपासून इंग्लड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पण धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने आता त्याला जवळ जवळ दोन-अडीच महिन्याची विश्रांती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंग्लंडला पराभूत करण्यासाठी आर. अश्विन आतुर
-अर्जुन तेंडुलकरची सुटका नाही, नेटकऱ्यांनी धरले पुन्हा एकदा धारेवर
-श्रीलंकेत असा पराक्रम करणारा केशव महाराज ठरला पहिला विदेशी गोलंदाज