मागील अनेक महिन्यांपासून मर्यादीत षटकांच्या भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करु शकतो, यावर बरीच चर्चा झाली आहे.
या क्रमांकासाठी अंबाती रायडू (Ambati Rayudu), दिनेश कार्तिक (Dinesh Karthik), रिषभ पंत (Rishabh Pant), केदार जाधव (Kedar Jadhav), हार्दिक पंड्या (Hardik Pandya), विजय शंकर (Vijay Shankar), श्रेयस अय्यर(Shreyas Iyer), मनिष पांडे(Manish Pandey) असे अनेक पर्याय वापरुन झाले आहेत.
परंतू आता भारतीय निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी अय्यर चौथ्या क्रमांकासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे.
इंग्लंडमधील आयसीसी विश्वचषका दरम्यान चौथ्या क्रमांकाची समस्या पाहायला मिळाली. ज्यामुळे एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनाही बऱ्याच टीकांना सामोरे जावे लागले होते.
“2019 च्या वर्ल्ड कपच्या योजनांमध्ये श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) समावेश न करणे दुर्दैवी होते,” असे प्रसाद यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
“जर तुम्हाला आठवत असेल तर 18 महिन्यांपूर्वी आम्ही श्रेयस अय्यरला वनडे सामन्यासाठी संघात समाविष्ट केले आणि त्याने चांगली कामगिरी केली होती. दुर्दैवाने आमच्याकडून अय्यरला संधी देण्यात चूक झाली,” असेही प्रसाद यावेळी म्हणाले.
प्रसाद यांना असा विश्वास आहे की अय्यर आता एक खेळाडू म्हणून विकसित झाला आहे. तसेच तो वनडे आणि टी20 या दोन्ही सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतो.
अय्यरने आत्तापर्यंत 9 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 49.42 च्या सरासरीने 346 धावा केल्या आहेत. तसेच 11 टी20 सामन्यांमध्ये 212 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी असा आहे विंडीज संघ
वाचा👉https://t.co/MTa4Dv58p2👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #INDvWI— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019
हे आहेत एमएस धोनीच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण…
वाचा👉https://t.co/djw9Kh3vaw👈#म #मराठी #TeamIndia #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #MSDhoni— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019