पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी अ संघाने सीसीआय अ संघाचा 22-8असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या साखळी सामन्यात पीवायसी अ संघाने सीसीआय अ संघाचा 22-8असा पराभव केला.
सामन्यात 110वयोगट दुहेरी गटात पीवायसी क संघाच्या हिमांशू गोसावी व डॉ.जमेनिस यांना सीसीआयच्या ड्रिंडा दयाल व सागर इंजिनिअर या जोडीने 4-6असे पराभूत करून संघाला आघाडी मिळवून दिली.
90अधिक गटात पीवायसीच्या पराग नाटेकर व हेमंत बेंद्रे या जोडीने सीसीआयच्या इम्रान व निखिल संपत यांचा 6-2असा पराभव करून हि आघाडी कमी केली.
त्यानंतर खुल्या दुहेरी गटात अभिषेक ताम्हाणेने रितू कुलकर्णीच्या साथीत सीसीआयच्या जयेश संपत व प्रसाद प्रधान यांचा 6-0 असा तर, खुल्या दुहेरी गटात पीवायसीच्या प्रशांत सुतार व केतन धुमाळ यांनी लव कोठारी व विक्रम संपत यांचा 6-0असा सहज पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीवायसी अ वि.वि.सीसीआय अ 22-8(110वयोगट दुहेरी गट: हिमांशू गोसावी/ डॉ.जमेनिस पराभूत वि.ड्रिंडा दयाल/सागर इंजिनिअर 4-6; 90अधिक गट: पराग नाटेकर/हेमंत बेंद्रे वि.वि.इम्रान/निखिल संपत 6-2; खुला दुहेरी गट: अभिषेक ताम्हाणे/रितू कुलकर्णी वि.वि.जयेश संपत/प्रसाद प्रधान 6-0; खुला दुहेरी गट: प्रशांत सुतार/केतन धुमाळ वि.वि.लव कोठारी/विक्रम संपत 6-0).