तेवीस ग्रँन्ड स्लँम विजेती अमेरिकन टेनिपटू सेरेना विलियम्स आज अबूधाबी येथिल मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेतून पुनरागमन करत आहे.ती आज २०१७ ची फ्रेंच ओपन स्पर्धेची विजेती जेलेना ओस्टापेनको हिच्याशी दोन हात करेल.
पुनरागमन सामन्यापूर्वीच्या पत्रकार परीषेदेत सरेना म्हणाली की,माझ्या मुलीच्या जन्मांतर मी पहिल्यांदाच व्यावसायिक स्पर्धेत सहभागी होत आहे. त्यामूळे माझ्या पुनरागमनाविषयी आनंदी व ऊत्साही आहे.
मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिपचे हे दहावे सत्र आहे व हि स्पर्धा या वर्षापासून महिलांसाठी खुली करण्यात आली आहे.
जानेवारी २०१७ च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या विजेतेपदानंतर सरेना प्रसूती रजेवर असल्याने वर्षभर टेनिसपासून दूर होती. तसेच २०१८ च्या मोसमात तिच्याकडून चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा असतील.