---Advertisement---

आता फुटबॉल जगतातही अंबानी पर्व! 381 अब्ज खर्चून ‘या’ इंग्लिश क्लबचे होणार मालक

On: रविवार, नोव्हेंबर 13, 2022 2:40 PM
---Advertisement---

भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी आता क्रिकेटपाठोपाठ आपला मोर्चा फुटबॉलकडे वळवला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रॅंचाईजी मुंबई इंडियन्सचे मालक असलेल्या अंबानी व त्यांच्या रिलायन्स समूहाने थेट, इंग्लंडमधील प्रीमियर लीग स्पर्धेतील लिव्हरपूल फुटबॉल क्लब विकत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. असे झाल्यास इंग्लंडमधील या प्रतिष्ठित स्पर्धेत संघ खरेदी करणारे ते दुसरे भारतीय ठरतील.

प्रीमियर लीग इतिहासातील यशस्वी संघांपैकी एक असलेल्या लिव्हरपूल संघाची मालकी सध्या फेनवे स्पोर्ट्स ग्रुपकडे आहे. मात्र, ते ही मालकी विकण्याच्या प्रक्रियेत असल्याचे समोर येतेय. त्यामुळे जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेल्या अंबानी यांनी हा क्लब खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अंबानी यांनी 12 वर्षांपूर्वी सहारा समूहासह हाच क्लब खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केलेली. मात्र, काही कारणास्तव हा करार पुढे जाऊ शकला नव्हता. परंतु, आता हा करार होण्याची शक्यता वाढली आहे.

फेनवे स्पोर्ट्स ग्रुपने क्लब विक्रीला काढताना त्याची किंमत 4 अब्ज पाऊंड म्हणजेच भारतीय रुपयात जवळपास 381 अब्ज इतकी मोठी आहे. हा करार पूर्णत्वास गेल्यास, वेंकीज समूहानंतर मोठा इंग्लिश फुटबॉल क्लब खरेदी करणारे अंबानी दुसरे भारतीय ठरतील. पोल्ट्री व्यवसायातील मोठे नाव असलेल्या व्यक्ती समूहाने 2010 मध्ये ब्लॅकबर्न रोव्हर्स संघ खरेदी केलेला.

अंबानी यांच्या रिलायन्स समूहाकडे सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स, युएईतील एमआय एमिरेट्स व दक्षिण आफ्रिकेतील एमआय केपटाऊन या संघाची मालकी आहे. तसेच एमआयजी रिलायन्स हे भारतातील सर्वात मोठी फुटबॉल लीग असलेल्या इंडियन सुपर लीगचे आयोजन करतात.

(Mukesh Ambani And Reliance Intrested In Own Liverpool FC)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20मध्ये बाबर आझम इंग्लंडचा कर्दनकाळ! आकडे पाहून विरोधी संघाला धक्का बसेल
T20WC: फायनलमध्ये टीम इंडिया नाही पण इंडियन तडका! एमसीजीमध्ये 13 वर्षीय भारतीय मुलीचा जलवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---