गुरुवारी (दि. २१ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने जबरदस्त प्रदर्शन केले. अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी न मिळालेल्या मुकेशने या सामन्यात मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांना शून्यावर तंबूत धाडले. या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर मुकेशने ऐतिहासिक विक्रम केला.
आयपीएलच्या इतिहासाता मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) तिसरा असा गोलंदाज बनला आहे, ज्याने विरोधी संघाच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना शून्य धावांवर बाद केले आहे. मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) डावाच्या पहिल्या षटकात स्वतःचे खाते खोलण्याआधीच विकेट गमावून बसले. दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाल्यामुळे मुंबईच्या अडचणी चांगल्याच वाढल्या.
Spell of FIRE!!! 🔥🔥🔥
Moondru Wicket Mukesh!#WhistlePodu #Yellove #MIvCSK 💛🦁 pic.twitter.com/di84svRvxV— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 21, 2022
आयपीएलचा पहिला हंगाम २००८ साली खेळला गेला होता. पाकिस्तानच्या सोहेल तन्वीर (Sohail Tanvir) याने या हंगामात सीएसकेविरुद्धच्या एका सामन्यात मुकेश चौधरीप्रमाणेच कामगिरी केली होती. तन्वीरने सीएसकेच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना शून्य धावेवर तंबूत धाडले होते. त्यानंतर अशीच कामगिरी आयपीएल २००९मध्ये झाली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या रायन हॅरिस (Ryan Harris) या वेगवान गोलंदाजाने दिल्ली कॅपिटल्सच्या दोन्ही सलामीवीरांना एकही धाव करू दिली नव्हती. आता या यादीत मुकेश चौधरी नव्याने सहभागी झाला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, अशी कामगिरी करणारा मुकेश भारताचा पहिला आणि अनकॅप्ड खेळाडू (राष्ट्रीय संघाकडून पदार्पण न करणारा) देखील ठरला. सीसकेसाठी टाकलेल्या पहिल्या षटकात मुकेशने दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्यानंतर तिसऱ्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीसाठी आला. मुकेशने टाकलेल्या या षटकात दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू आणि मुंबई इंडियन्ससाठी चांगले प्रदर्शन करणारा डेवाल्ड ब्रेविसने विकेट गमावली. अशा पद्धतीने मुकेशने या सामन्यात टाकलेल्या त्याच्या सुरुवातीच्या दोन षटकात मुंबईच्या तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
आयपीएलमध्ये विरोधी संघाच्या दोन्ही सलामीवीरांना शून्य धावांवर बाद करणारे गोलंदाज
सोहेल तनवीर (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, २००८)
रायन हॅरिस (विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २००९)
मुकेश चौधरी (विरुद्ध मुंबई इंडियन्स २०२२)*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाव मोठं अन् लक्षण खोटं! कोट्यावधी रुपयांमध्ये विकले गेलेले ‘हे’ तीन परदेशी खेळाडू ठरतायत फ्लॉप
मुंबईचे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता पहिल्याच षटकात तंबूत; रोहितच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
‘भारत- पाकिस्तानपेक्षा कमी नाही मुंबई आणि चेन्नईचा सामना’, असं का म्हणाला हरभजन सिंग?