आयपीएल 2025 च्या स्थगितीनंतर स्पर्धा पुन्हा सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्स (MI) आयपीएल प्लेऑफच्या रेसमध्ये पोहोचण्यासाठी दावेदार आहे. त्यांचे लीग स्टेज मधील दोन सामने उरले आहेत. तत्पूर्वी मुंबई संघाबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबईच्या संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई संघातील तीन खेळाडू आयपीएलच्या प्लेऑफ साठी संघाचा भाग नसणार आहेत. मुंबईतील अनेक खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी माघारी त्यांच्या देशात परत जाणार आहेत.
मुंबई इंडियन्सने संघातील तीन खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. संघात सामील असलेले विल जॅक्स (will jacks), रयान रिकल्टन (ryan ricklton) आणि कॉर्बिन बॉश (corbion bosch) हे तीनही खेळाडू लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यानंतर त्यांच्या देशात परत जातील. मुंबईने या खेळाडूंच्या रिप्लेसमेंटच्या जागी इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि श्रीलंकेच्या चरिथ असलंका निवडले आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला रयान रिकल्टनच्या जागी 1 करोड रुपयांना खरेदी केले आहे. तसेच चरिथ असलंकाला 75 लाख रुपयांच्या किमतीने स्क्वाडमध्ये सामील करण्यात आले आहे.
विल जॅक्सच्या जागी इंग्लिश यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोला संघात सामील केले आहे, ज्याची किंमत 5.25 करोड रुपये इतकी आहे. जर मुंबईने प्लेऑफमध्ये त्यांची जागा पक्की केली तर, हे तीनही खेळाडू प्लेऑफच्या सामन्यांपासून संघाचा भाग असतील.
मुंबईचे लीगस्टेज मधील दोन सामने राहिले आहेत. तसेच प्लेऑफच्या रेसमध्ये त्यांच्यासोबत दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) सुद्धा आहे. 3 संघांनी प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित केले आहे, तसेच 5 संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाले आहेत.
हार्दिक पांड्याच्या (hardik pandya) नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाचे लीग स्टेज मधील दोन सामने उरले आहेत. त्यांना दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यांचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे, जो वानखेडे (wankhede stadium) स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या (playoffs) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
आता मुंबई किंवा दिल्ली मधील एकच संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. (21 मे )रोजी होणाऱ्या सामन्यात जो संघ जिंकेल त्याच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा वाढतील. पण सामना पराभूत होणारी टीम रेसमध्ये कायम असेल. दोन्ही संघांचा शेवटचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे.
मुंबईचा प्रयत्न असेल की, दोन्ही सामन्यात विजय मिळवणे. जर दिल्लीकडून पराभव झाला तर पुढच्या सामन्यात पंजाबचा पराभव करून दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा पुढचा सामना पंजाब विरुद्ध पराभूत होणे गरजेचे आहे.






