मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग 2022-23च्या (आयएसएल) पर्वात दमदार कामगिरी करताना तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. आता त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी राखून प्ले ऑफमधील जागा निश्चित करायची आहे. शनिवारी (24 डिसेंबर) घरच्या मैदानावर त्यांना चेन्नईयन एफसीचा सामना करावा लागणार आहे आणि या सामन्यात गोलधमाका अपेक्षित आहे. मागच्या वेळेस जेव्हा हे दोन संघ समोरासमोर आले होते, तेव्हा मुंबई सिटीने 6-2 असा दणदणीत विजय मिळवला होता.
मागील आठवड्यात मुंबई सिटी एफसीने सातत्यपूर्ण कामगिरी करताना ईस्ट बंगाल एफसीवर विजय मिळवला होता. लालेंगमाविया राल्टेने हिरो आयएसएलमध्ये प्रथमच एका सामन्यात दोन गोल केले आणि ग्रेग स्टीवर्टनेही गोलखाते उघडले. मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहमचा हा संघ आता 24 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मुंबई सिटी एफसीने बचाव ते आक्रमण या सर्व आघाड्यांवर दमदार कामगिरी केली आहे आणि यंदाच्या पर्वात त्यांचा खेळ उच्च दर्जाचा झालेला दिसतोय. प्रती सामना तीन गोल या सरासरीने ते यंदा गोल धमाका करत आहेत. जॉर्ज डिएझ हा यंदाच्या पर्वात सर्वाधिक गोल करणाऱ्या अल खयातीला मागे टाकण्यापासून केवळ एक गोल दूर आहे. पण, उद्याच्या सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.
”चेन्नईयन एफसीच्या ताफ्यात खूप चांगले खेळाडू आहेत, परंतु आम्हीही काही कमी नाही. आमची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे आणि आमचे खेळावर पूर्ण नियंत्रण आहे. ते कोणत्या फॉरमेशनसह किंवा खेळाडूंसह मैदानावर उतरतील याची आम्हाला कल्पना नाही. आता सर्वांचे लक्ष आमच्याकडेच आहे आणि आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत,”असा विश्वास बकिंगहॅम यांनी व्यक्त केला.
चेन्नईयनने मागील लढतीत नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीवर 7-3 असा दणदणीत विजय मिळवला होता, परंतु त्यानंतर केरळा ब्लास्टर्सने त्यांना बरोबरीत रोखले. व्हिन्सी बॅरेट्टोच्या गोलने त्यांना वाचवले. थॉमस ब्रॅडरिचच्या संघाने 10 सामन्यांत 20 गोल केले आहेत, परंतु मुंबईच्या खात्यात 30 गोल आहेत.
मंडळी, join us for #TheIslanders’ final game of the year as we host the Marina Machans at the Mumbai Football Arena tomorrow evening! 🤩💙
Book your tickets today ⤵️#MCFCCFC #MumbaiCity #AamchiCity 🔵
— Mumbai City FC (@MumbaiCityFC) December 23, 2022
या सामन्यापूर्वी चेन्नईयनला मोठा धक्का बसला आहे आणि मध्यरक्षक अल खयाती याला दुखापत झाली आहे. तो संघासोबत मुंबईत आलेला नाही. त्याने सात सामन्यांत सात गोल केले आहेत आणि चार गोलसाठी सहाय्य केले आहे.
”दुर्दैवाने अल खयाती हा दुखापतीमुळे संघासोबत इथे आलेला नाही. तोही खूप निराश आहे, कारण त्याचा फॉर्म हा सध्या दमदार सुरू आहे. त्याचे असणे हे संघासाठी खूप फायद्याचे असते. तो पुन्हा कधी मैदानावर उतरेल, याची कल्पना नाही. तो जमशेदपूर एफसी विरुद्ध सामनाही खेळण्याची शक्यता कमी आहे. पण, सध्या आम्ही आहे त्या खेळाडूंसह चांगला खेळ करण्याच्या प्रयत्नात आहोत, ”असे ब्रॅडरिच म्हणाले.
हिरो आयएसएलमध्ये दोन संघांमध्ये झालेल्या 17 सामन्यांत मुंबईने 8, तर चेन्नईयनने 8 विजय मिळवले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: वयाच्या 16व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरची विकेट घेणारा पियुष चावला
हैदराबाद एफसीची पुन्हा अव्वल स्थानी झेप; बंगळुरू एफसी घरच्या मैदानावर अपयशी