मुंबई, 8 जानेवारी 2023: फॉर्मात असलेल्या मुंबई सिटी एफसीचे काही खरे नाही. इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) मॅचवीक 14मधील संडे ब्लॉकबस्टर्समध्ये (8 जानेवारी) त्यांनी घरच्या मैदानावर केरळ ब्लास्टर्स एफसीचा 4-0 असा धुव्वा उडवला. यजमानांचा हा सलग आठवा विजय ठरला. आयएसएलमध्ये सर्वाधिक सलग सामने जिेंकण्याचा हा विक्रम आहे.
गुणतालिकेत अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या स्थानी असलेले मुंबई फुटबॉल अरेनामध्ये आमनेसामने असल्याने चुरशीची लढत अपेक्षित होती. मात्र, मुंबईला विजयासाठी फार प्रयास पडले नाहीत. सामन्यातील सुरुवातीच्या 22 मिनिटांमध्ये घेतलेली 4-0 अशी मोठी आघाडी त्यांच्या मोठ्या विजयाची पायाभरणी करणारी ठरली. जॉर्ज डियाझ (चौथ्या आणि 22व्या मिनिटाला), ग्रेग स्टीवट (दहाव्या मिनिटाला), बिपीन सिंग (16व्या मिनिटाला) तसेच लालियानझुआला छांगटे असे एकाहून एक खेळाडू मुंबई सिटी एफच्या विजयाचे शिल्पकार (मॅचविनर) ठरले.
मुंबई सिटीचे चारही गोल पहिल्या सत्रातील आहेत. त्यातील तीन गोल 12 मिनिटांच्या फरकाने झाले. 4-2-3-1 अशा फॉर्मेशनने खेळणार्या यजमानांनी पहिल्या मिनिटापासून प्रभावी आक्रमण केले. बिपीन सिंगने चेंडूवर ताबा मिळवत ग्रेग स्टीवर्टकडे चेंडू पास केला. पुढे केरळ ब्लास्टर्सच्या गोल एरियामध्ये पोहोचल्यानंतर स्टीवर्टने पुन्हा त्याच्याकडे चेंडू सोपवला. बिपीनने मारलेला फटका प्रतिस्पर्धी गोलकीपर प्रभसुखन गिलने डाव्या बाजूला झेप घेत अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून चेंडू हिरावून घेत जॉर्ज डियाझने मुंबई सिटीचे खाते उघडले. त्यानंतर 12 मिनिटांच्या फरकाने 3 गोल झाले. दहाव्या मिनिटाला लालियानझुआला छांगटे याच्या अप्रतिम पासवर ग्रेग स्टीवर्टने आघाडी वाढवली. सहा मिनिटांनी बिपीन सिंगने जॉर्ज डियाझच्या मदतीने बिपीन सिंगने आणखी भर घातली.22व्या मिनिटाला जॉर्ज डियाझने वैयक्तिक दुसरा गोल करताना यजमानांना 4-0 असे आघाडीवर नेले. हा गोल करण्यात त्याला अहमद जाहू याची मदत झाली. पूर्वार्धातील शेवटच्या 23 मिनिटांमध्ये केरळ ब्लास्टर्सच्या बचावफळीने अधिक सतर्कता बाळगत मुंबई सिटीच्या आक्रमण फळीला आणखी गोल करण्यापासून रोखले.
मध्यंतराच्या मोठ्या आघाडीनंतर यजमानांकडून उत्तरार्धात आणखी गोलांची अपेक्षा होती. मात्र, प्रतिस्पर्धी केरळ ब्लास्टर्स एफसीने पूर्वार्धातून बोध घेत बचाव फळीमध्ये सुसूत्रता आणली. अनेक महत्त्वाचे बदल केले. शिवाय, मुंबई सिटी एफसीच्या आक्रमण फळीला गोल एरियाच्या आधीच रोखले. त्यामुळे दुसर्या सत्रात यजमानांना गोलसंख्येत आणखी भर घालता आली नाही.रविवारच्या विजयाने मुंबई सिटीने 2022-23 हंगामातील अजिंक्य परंपरा कायम ठेवली. 13 सामन्यांतून त्यांची विजयी सामन्यांची संख्या 10वर नेली. तसेच 33 गुणांसह हैदराबाद एफसीला मागे टाकून अव्वल स्थानी झेप घेतली. मुंबई सिटी विरुद्धच्या पराभवानंतर केरळ ब्लास्टर्स हे गुणतालिकेत तिसर्या स्थानी आहेत. 13 सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात 25 गुण आहेत. हा त्यांचा चौथा पराभव आहे.
निकाल – मुबई सिटी एफसी-4(जॉर्ज डियाझ-चौथ्या आणि 22व्या मिनिटाला, ग्रेग स्टीवट-दहाव्या मिनिटाला, बिपीन सिंग-16व्या मिनिटाला) विजयी वि. केरळ ब्लास्टर्स एफसी-0.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताला मोठा धक्का! सहा वेळा जागतिक चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या मेरी कॉमची प्रमुख स्पर्धेतून माघार
अलभ्य लाभ! वर्षभरात केवळ दोनदा सोबत खेळलेत रोहित, विराट आणि बुमराह