मुंबई | भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य क्रिकेट असोशियशन मुंबई सध्या नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने ६ जुलै पर्यंत प्रशिक्षक पदासाठी उमेदवारी अर्ज मागविले होते.
६ जुलैपर्यंत १९ वर्षाखालील मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदासाठी एकून आठ अर्ज आले होते. तर वरीष्ठ संघासाठी फक्त सहा अर्ज आल्याने एमसीए नाराज आहे.
त्यामुळे एमसीएने प्रशिक्षक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३ दिवसांनी वाढवून ९ जुलै केली आहे.
बुधवारी (११ जुलै) एमसीएची क्रिकेट सुधारणा समिती मुंबईच्या वरीष्ठ आणि १९ वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे.
भारताचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार, माजी यष्टीरक्षक फंलंदाज अजय रात्रा आणि प्रथम श्रेणी क्रिकेटपटू विनायक सामंत यांनीही मुंबई वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केले आहे.
तर १९ वर्षाखालिल मुंबई संघासाठी नंदन फडणीस, प्रीतम गंधे आणि विनोद राघवन यांनी दोन्ही संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-आणि कॅप्टन कूलचा तो ‘कूल’ विक्रम हुकला!
-भारतीय संघातील हा खेळाडू आहे रैनाचा बॅटिंग गुरू