बिहारने ठेवलेल्या या छोट्याशा लक्षाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा (33*) आणि अखिल हेरवाडकर(24) यांनी अर्धशतकी सलामी दिली. सामना जिंकण्यासाठी 17 धावा कमी असताना हेरवाडकर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि आदित्य तरे यांनी मुंबई संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या उपांत्यपुर्व सामन्यात दिल्लीने हरियाणाचा 5 विकेटने पराभव केला. हरियाणाने ठेवलेले 230 धावांचे लक्ष दिल्लीने 39.2 षटकात सहज गाठले. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने शानदार 69 चेंडूत शतक झळकावले.
पहिला उपांत्य सामना दिल्ली आणि मुंबईच्या संघात 17 आॅक्टोबरला बेंगलुरूत एम चेन्नास्वामी मैदानात होणार आहे.
दुसरा उपांत्य सामना महाराष्ट्र आणि झारखंड यांच्यातील विजेत्याचा, आंध्र प्रदेश आणि हैद्राबाद यांच्यातील विजेत्या संघासोबत 18 आॅक्टोबरला होणार आहे.
स्पर्धेतील अंतिम सामना 20 आॅक्टोबरला एम चेन्नास्वामी मैदानात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-