2024च्या ‘सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी’तील (Syed Mushtaq Ali Trophy) फायनल सामना मध्य प्रदेश विरूद्ध मुंबई (Madhya Pradesh vs Mumbai) संघात खेळला गेला. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानावर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने वर्चस्व गाजवत जेतेपद पटकावले. मुंबईने 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर मुंबई संघाने टाॅस जिंकून मध्य प्रदेशला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने 8 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा केल्या. मध्य प्रदेशसाठी कर्णधार ‘रजत पाटीदार’ने (Rajat Patidar) सर्वाधिक धावा केल्या. पाटीदारने 40 चेंडूत नाबाद 81 धावा ठोकल्या. दरम्यान त्याने 6 चौकारांसह 6 षटकार लगावले. सुभ्रांशु सेनापती (23), राहुल बाथम (19), व्यंकटेश अय्यर (17), हरप्रीत सिंग (15) धावांच्या जोरावर मध्य प्रदेशने मुंबईसमोर 175 धावांचे लक्ष ठेवले होते.
मुंबईसाठी शार्दुल ठाकूर आणि राॅयस्टन दियासने 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. अथर्व अन्कोलेकर, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे या खेळाडूंनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
175 धावांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेल्या मुंबईसाठी स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadva) सर्वाधिक धावा केल्या. सूर्याने 35 चेंडूत 48 धावांची खेळी केली. दरम्यान त्याने 4 चौकारांसह 3 षटकार ठोकले. युवा प्रतिभावान खेळाडू सूर्यांश शेडगेने (Suryansh Shedge) शेवटी संघासाठी 36 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून मुंबईला शानदार विजय मिळवून दिला. आपल्या खेळीत त्याने 3 चौकारांसह 3 उत्तुंग षटकार ठोकले. पृथ्वी शाॅ (10), अजिंक्य रहाणे (37), कर्णधार श्रेयस अय्यर (16), अथर्व अन्कोलेकर (16) धावा या खेळाडूंनी देखील विजयात महत्वाची भूमिका बजावली.
मध्य प्रदेशसाठी त्रीपुरेश सिंगने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तर शिवम शुक्ला, व्यंकटेश अय्यर आणि कुमार कार्तिकेयाने 1-1 विकेट्स आपल्या नावावर केली.
महत्त्वाच्या बातम्या-
शानदार शतक झळकावल्यानंतर स्टीव्ह स्मिथ म्हणाला, “माझ्यासाठी गेली 3 वर्षे सर्वात कठीण…”
28 चेंडूत 12 चौकारांसह अर्धशतक, आरसीबीच्या फलंदाजाची फायनलमध्ये धमाल!
WPL Auction; लिलावात विकले गेले 19 खेळाडू, भारतीय खेळाडूंंनी गाजवले वर्चस्व!