आयपीएलचा १३ वा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला युएईत आयपीएलचाच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. गतविजेता मुंबई इंडियन्स संघ आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघ यांच्यात सलामीचा सामना रंगले. पाचव्या जेतेपदासाठी मुंबईचा संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरेल तर तितक्याच ताकदीनिशी चेन्नई संघ देखील चौथ्या जेतेपदासाठी मैदानात उतरेल.
आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सची ख्याती आहे. २०१९ च्या हंगामात मुंबईने अंतिम सामन्यात चेन्नईवर एका धावेने मात करत विजेतेपद पटकावलं होतं. मुंबई इंडियन्स संघाने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. मुंबई संघात सर्वच उत्तम खेळाडू आहेत. या लेखात मुंबई इंडियन्स संघातील ३ प्रमुख खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, जे या संघाचे खरे शिलेदार आहेत.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya)
मुंबई इंडियन्स संघाचा ‘रॉकस्टार’ खेळाडू हार्दिक पंड्या मुंबई संघासाठी ‘मॅच विनर’ खेळाडू म्हणून भूमिका बजावेल. तो त्याच्या अष्टपैलू खेळीने मुंबई संघाला या हंगामात विजय मिळवून देऊ शकतो.
त्याने आयपीएलमधील पदार्पण केलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ८ चेंडूत २१ धावा केल्या होत्या. त्याने मागील हंगामातील १६ सामन्यात ४०२ धावा केल्यात, तर आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या ५ हंगामातील ६६ सामन्यात १०६८ धावा केल्या आहेत. यात त्याने ३ अर्धशतक ठोकले आहेत. त्याची ९१ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने एकूण ७२ चौकार आणि ६८ षटकार ठोकले आहेत. तसेच गोलंदाजीतही त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. ६६ सामन्यात त्याने ४२ बळी मिळवले आहेत.
यंदाच्या हंगामासाठी तो मैदानावर जबरदस्त सराव करताना दिसत आहे. तो मुंबई संघाचा एक महत्वाचा खेळाडू असून आयपीएल २०२० चषक मुंबई संघाला मिळवून देऊ शकतो.
किरॉन पोलार्ड (Kieron Pollard)
कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळल्यानंतर पोलार्ड आपल्या परिवारासोबत युएईत दाखल झाला आहे. अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड यंदा फॉर्मात असणं मुंबई इंडियन्ससाठी फायदेशीर मानलं जातंय. कॅरेबिअन प्रमिअर लीग स्पर्धेत पोलार्डच्या नेतृत्वाखाली त्रिंबागो नाईट रायडर्स संघाने विजेतेपद मिळवलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा संघ या स्पर्धेत एकही सामना हरला नाही.
पोलार्डने संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी आणि फलंदाजीत अष्टपैलू कामगिरी करत मालिकावीराचा किताब पटकावला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून खेळतानाही पोलार्डने आपला फॉर्म कायम राखल्यास संघाला त्याचा फायदा होईल.
पोलार्डने आयपीएलमध्ये आतापर्यंत १४८ सामने खेळले असून त्यात २७५५ धावा केल्या आहेत. त्यात त्याने १४ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच गोलंदाजीत त्याने ५६ बळी मिळवले आहेत. मागील १० हंगाम तो आयपीएलमध्ये सतत खेळत आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma)
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. रोहितने मुंबई इंडियन्सला ४ वेळा विजेतेपदं मिळवून दिली आहे.
आतापर्यंत १८८ आयपीएल सामने खेळलेल्या रोहित शर्माच्या नावावर ४८९८ धावा जमा आहेत. आयपीएल कारकिर्दीत रोहितची सरासरी ही ३१.६२ अशी असून त्याचा स्ट्राईक रेटही १३०.८२ एवढा आहे. आतापर्यंच्या आयपीएल कारकिर्दीत रोहित शर्माच्या नावावर एक शतक आणि ३६ अर्धशतकं जमा आहेत.
रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याचा हा फॉर्म मुंबई संघासाठी महत्वाचं ठरेल. तो सलामीला फलंदाजीस येऊन आपल्या स्फोटक फजंदाजीने मोठी धावसंख्या उभारू शकतो. याचा फायदा संघाला होईल. यंदाच्या हंगामातही तो जबरदस्त फलंदाजी करून संघाला आयपीएल २०२० चषक मिळवून देऊ शकतो.
आयपीएल २०२० – मुंबई इंडियन्सचे सामने
१९ सप्टेंबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
२३ सप्टेंबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२८ सप्टेंबर २०२०
विरद्ध रॉयल चाललेंजर्स बंगलोर
०१ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब
०४ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
०६ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स
११ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
१६ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१८ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब
२३ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
२५ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२८ ऑक्टोबर २०२०
विरद्ध रॉयल चाललेंजर्स बंगलोर
३१ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
०३ नोव्हेंबर २०२०
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
संपूर्ण मुंबई इंडियन्स संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, क्रुणाल पंड्या, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, आदित्य तारे, सुचित रॉय, धवल कुलकर्णी, क्विंटन डिकॉक, केरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिशेल मॅकक्लेघन, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, नॅथन कुप्पर नाईल, मोसिन खान, दिग्विजय देशमुख.