चेन्नई सुपर किंग्स प्रमाणेच आता गतवर्षीचा आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्सही शुक्रवारी (13 ऑगस्ट) दुबईला रवाना होण्याच्या तयारीत आहे. दोन्ही संघ 19 सप्टेंबरला युएईमध्ये आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आमनेसामने असतील. न्यूज एजन्सी एएनआयने माहिती दिली आहे की, मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी दुबईला जाण्यासाठी इच्छुक आहे आणि संघ प्रवासाच्या परवानगीची वाट पाहत आहेत.
आयपीएल 2021 मधील उर्वरीत सामने युएईच्या अबू धाबी, शारजाह आणि दुबई येथील मैदानावर खेळवले जाणार आहेत. बायो-बबलच्या सुरक्षित वातावरणात कोरोना वायरसचा प्रसार झाल्यामूळे चालू हंगाम अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आला होता.
माध्यमांतील वृत्तांनुसार, “मुंबई इंडियन्स संघ सीएसकेप्रमानेच युएई सरकारकडून भारतातून युएईला प्रवास करण्याच्या परवानगीची वाट पाहत आहे आणि तेही शुक्रवारी युएईला जाऊ इच्छीत आहेत. मुंबईच्या खेळाडूंचा प्रवास बबल-टू-बबल होईल, यानंतरही ते युएईत जाऊन कोरोना नियमांप्रमाने विलगीकरणात राहतील. खेळाडू आधिपासूनच बायो-बबलमध्ये आहेत. त्यांनी सराव सुरू केलेला आहे त्यामुळे हा प्रवास बबल-टू-बबल होणार आहे.”