आयपीएल 2023 (IPL 2023 Auction) साठी शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला. लिलावात भारतीय आणि विदेशी दिग्गजांवर कोट्यावधी रुपये खर्च केले. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएलच्या दोन सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहेत आणि त्यांनी देखील खेळाडूंवर मनसोक्त खर्च केला. हे दोन संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम संघ असले, तरी त्यांचे मागच्या हंगामातील प्रदर्शन पाहता सुधारणा करावी लागणार आहे.
आयपीएल 2023 साठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघांनी त्यांचा संघ तयार केला आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या लिलावात मुंबईने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन (Cameron Green) याला तब्बल 17.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. ग्रीन आता आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने इंग्लंडचा अष्टपैली आणि त्यांच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला संघात सामील केले. स्टोक्ससाठी सीएसकेने तब्बल 16.25 कोटी रुपये खर्च केले. दरम्यान, मुंबई आणि सीएसकेने 2022 पूर्वी खेळाडूंच्या लिलावात एकदाही 10 कोटींपेक्षा मोठी बोली लावली नव्हती.
आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या इतिहासात चौथ्यांदा विजेता बनला. या हंगामात मुंबई इंडियन्स मात्र पाचव्या क्रमांकावर होता. त्यानंतर आयपीएल 2022 मध्ये सीएसकेवर पुन्हा एकदा चांगले प्रदर्शन करण्याचा दबाव होता, तर दुसरीकडे मुंबईवर संघ या हंगामात गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर राहिला होता. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात वेगवान गोलंदाज दीपक चाहरसाठी सीएसकेने 14 कोटी रुपये खर्च केले होते, मात्र दुखापतीमुळे चाहरला या हंगामातील एकही सामना खेळता आला नव्हता. तर दुसरीकडे मुंबईने इशान किशनला पुन्हा खरेदी करण्यासाठी लिलावात 15.25 कोटी रुपये खर्च केले होते. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा या संघांनी लिलावात खेळाडूंवर 10 कोटींपेक्षा मोठी रक्कन खर्च केली होती.
2020 नंतर सुरू झाला सीएसकेचा खराब काळ
आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा खराब काळ सुरू झाला होता. त्यावेळी संघात अनुभवी खेळाडूंची संख्या जास्त असल्यामुळेही त्यांच्यावर वारंवार टीका देखील होत होती. पण 2021 मध्ये सीएसकेने या टीकांना चोख उत्तर देत विजेतेपद पटकावले. असे असले तरी, सीएसकेचे हे प्रदर्शन 2022 हंगामात कायम राहू शकले नाही. या हंगामात सीएसके 9 व्या क्रमांकावर राहिला. अशात आगामी हंगामात त्यांना स्वतःचे प्रदर्शन सुधारायचे आहे. याच पार्श्वभूमीवर सीएसकेने बेन स्टोक्सला मोठी रक्कम खर्च करून ताफ्यात सामील केले.
मुंबईने 2013 मध्ये जिंकले पहिले विजेतेपद
मुंबई इंडियन्सने 2013 साली त्यांची पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. या हंगामानंतर आयपीएलमध्ये मुंबईने पाच वेळा विजेतेपद पटकावले. पण मागच्या दोन हंगामांमध्ये मुंबईचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. 2009 नंतर असे पहिल्यांदाच झाले की, मुंबई प्लेऑफमधून सलग दोन हंगाम बाहेर राहिला. 2021 मध्ये संघ 5 व्या, तर 2022 मध्ये संघ 10 व्या क्रमांकावर राहिला आहे. आगामी हंगामात मात्र संघाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा असतील. आगामी हंगामासाठी मुंबईकडे जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह ही वेगवान गोलंदाजांची जोडी असणार आहे. तर संघात सूर्यकुमार यादव, इशान किशन, रोहित शर्मा, डेवॉर्ड ब्रेविस अशा फलंदाजाचीही भरमार आहे. असे असले तरी, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड अशा दिग्गजांची कमी त्यांना नक्कीच भासणार आहे. (Mumbai Indians and CSK are under pressure to perform well in the upcoming IPL season)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू, पण चर्चा फक्त त्याच्या गर्लफ्रेंडचीच; लव्हलाईफबद्दल वाचाच
लिलावात सर्वाधिक रक्कम घेऊन उतरलेल्या हैद्राबादने ‘या’ तिघांवरच उधळले 26 कोटी, पाहा संपूर्ण संघ