आयपीएल 2025 साठी सर्व संघांची तयारी सुरू झाली आहे. येत्या डिसेंबरमध्ये मेगा ऑक्शन होईल. त्यापूर्वी संघ आपापल्या कोचिंग स्टाफच्या नियुक्त्या करत आहेत.
दरम्यान, 5 वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं एक मोठी घोषणा केली. रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सनं पारस म्हांब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. म्हांब्रे यापूर्वी भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक राहिले आहेत. आता त्यांना मुंबई इंडियन्सची जबाबदारी मिळाली.
मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा सध्या त्यांचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. तर माजी भारतीय खेळाडू टीए सेकर त्याचे सहय्यक आहेत. आता म्हांब्रे यांची संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. म्हांब्रे यांच्याकडे कोचिंगचा भरपूर अनुभव आहे. ते 2024 टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. 2023 विश्वचषकातील भारताच्या शानदार गोलंदाजीचं श्रेय देखील त्यांना जातं.
2008 मध्ये जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली, तेव्हा मुंबई इंडियन्सचं सेटअप बनवण्यात पारस म्हांब्रे यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय ते 2020 अंडर 19 विश्वचषकात टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. आता ते अनेक वर्षांनंतर मुंबई इंडियन्समध्ये परतले आहेत. मुंबईकडे अनेक प्रतिभाशाली गोलंदाज आहेत. आता त्यांना म्हांब्रे यांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो.
मुंबई इंडियन्सबद्दल बोलायाचं झालं तर, 2024 आयपीएलमध्ये त्यांची कामगिरी फारच खराब राहिली होती. नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ गुणतालिकेत तळाशी राहिला होता. याशिवाय हार्दिक पांड्याच्या आगमनामुळे संघातील इतर वरिष्ठ खेळाडू नाराज असल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. आता बोललं जातंय की, संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुढील हंगामात मुंबईची साथ सोडू शकतो. आता यावर टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
या गोलंदाजासमोर बुमराह-शमी देखील फेल, बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी
ind vs ban; टीम इंडियाने टी20 मलिका गाजवली; पाकिस्तानचा हा विक्रम मोडीत
टीम इंडियाची हैदराबादमध्ये रेकाॅर्डतोड कामगिरी; बांग्लादेशच्या बत्या गुल..!