आगामी आयपीएलपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे अनेक मोठ्या खेळाडूंचे संंघ बदलताना दिसणार आहेत. आयपीएल 2025च्या मेगा लिलावाची तारीख अद्याप स्पष्ट झाली नाही. पण कोणता संघ कोणता खेळाडू कायम ठेवणार, असे प्रश्न चाहत्यांचा लिलावापूर्वी उत्साह वाढवत आहेत. आता सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, केवळ रोहित शर्माच (Rohit Sharma) नाही तर हार्दिक पांड्यालाही (Hardik Pandya) आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्समधून सोडले जाऊ शकते.
शेवटच्या हंगामात मुंबई इंडियन्सनं (MI) आयपीएल 2024 साठी पांड्याचा गुजरात टायटन्ससोबत व्यवहार केला होता. अशा परिस्थितीत एमआयचे कर्णधारपद रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातून काढून हार्दिकला दिलं होतं. गेल्या हंगामातही रोहित आणि एमआय व्यवस्थापन यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचा अंदाज लावला जात होता. आता केवळ रोहितच नाही तर हार्दिक पांड्यालाही संघातून वगळले जाऊ शकते अशी बातमी आहे.
रोहित आणि हार्दिकसह 4 खेळाडूंना सोडण्याची अटकळ बांधली जात आहे. दुसरीकडे, मेगा लिलावापूर्वी सूर्यकुमार यादवला कायम ठेवून मुंबई इंडियन्स पुढील हंगामासाठी नवीन कर्णधाराची नियुक्ती करू शकते. असा दावा केला जात आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज राहू शकतो, तर ईशान किशन आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, मुंबई आकाश मधवाल आणि निहाल वढेरा यांना राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
53 वर्षात केवळ 12 द्विशतक; वनडेमध्ये हा विश्वविक्रम करणारे चक्क इतके भारतीय खेळाडू
आगामी आयपीएलमध्ये रिषभ पंत चेन्नईमध्ये होणार दाखल? फोटो शेअर करुन दिली मोठी हिंट
बाबर आझमच्या बत्या गुल! शून्यावर बाद होताच सोशल मीडियावर ठरला बळीचा बकरा