---Advertisement---

मुंबई इंडियन्सने बाहेर बसवलेला खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध तुफान फॉर्मात, पहिल्या टी-20 मध्ये विक्रमी कामगिरी!

On: रविवार, ऑगस्ट 10, 2025 7:10 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) दोन्ही संघात 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. पहिला सामना 10 जुलैला खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तरुण वेगवान गोलंदाज क्वेना मफाका (Kwena Maphaka) याने जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा विक्रम केला. अशा प्रकारचा पराक्रम करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला तरुण गोलंदाज ठरला आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी केली. केवळ 19 वर्षांच्या मफाकाने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकांत फक्त 20 धावा दिल्या आणि 4 खेळाडू बाद केले. त्याने टिम डेविड, मिचेल ओव्हेन, बेन ड्वार्शुइस आणि अॅडम झम्पा यांना माघारी पाठवले. अशाप्रकारे, तो टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 4 विकेट्स घेणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. केवळ 19 व्या वर्षी त्याने हा विक्रम केला.

ऑस्ट्रेलियाचा स्कोअर एकवेळ 75 धावांत 6 खेळाडू बाद असा झाला होता. त्यानंतर टिम डेविडने (Tim David) दमदार फलंदाजी करत संघाला मोठा स्कोअर उभारण्यास मदत केली. मफाकाशिवाय कागिसो रबाडाने 2 विकेट्स घेतले.

आयपीएल 2024 मध्ये मफाकाला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले होते. संपूर्ण हंगामात त्याला फक्त 2 सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. बाकी वेळ तो बाकावरच होता. मुंबईसाठी त्याने 2 सामन्यांत 1 विकेट्स घेतली होती.

या सामन्यात टिम डेविड (Tim David) हा ऑस्ट्रेलियासाठी अर्धशतक करणारा एकमेव फलंदाज ठरला. त्याने 52 चेंडूत 83 धावांची शानदार खेळी केली. त्यात 8 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. डेविडशिवाय कॅमेरॉन ग्रीनने (Camron green) फक्त 13 चेंडूत 35 धावा केल्या. या दोघांच्या जोरदार फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत सर्वबाद 178 धावा केल्या. मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) यांनी अनुक्रमे 13 आणि 2 धावांचे योगदान दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---