---Advertisement---

विजयी कॅप्टन हरमनने स्पर्धेपूर्वी दिलेला शब्द खरा करून दाखवला; म्हणालेली, ‘मी रोहित शर्माचा…’

On: रविवार, मार्च 26, 2023 11:39 PM
Harmanpreet-Kaur-And-Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार म्हणून उतरली होती. मुंबईने  टाकलेली कर्णधारपदाची जबाबदारी हरमनने लीलया पार पाडली. हरमनप्रीतने आधी मुंबईला डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले. त्यानंतर रविवारी (दि. 26 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स महिला संघाला 7 विकेट्सने पराभूत करून मुंबईला स्पर्धेचे पहिले-वहिले विजेतेपदही जिंकून दिले. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी हरमनप्रीत कौर हिने रोहित शर्मा याच्याविषयी मोठे भाष्य केले होते. चला त्याविषयी जाणून घेऊयात…

काय म्हणालेली हरमनप्रीत कौर?
महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले होते. ती म्हणाली होती की, “कर्णधार म्हणून मी रोहित शर्माचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. त्याने मुंबईसाठी केलेली कामगिरी शानदार आहे. आम्हीदेखील विजय मिळवण्याचे ध्येय ठेवू.”

https://twitter.com/mipaltan/status/1631149882575835136?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1631149882575835136%7Ctwgr%5Eb6182bb82e9d9055c5acb258d71823c27d929052%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fsports%2Fwpl-2023-harmanpreet-kaur-vouches-to-follow-rohit-sharmas-legacy-for-mi-5923459%2F

पुढे बोलताना हरमनप्रीत म्हणाली होती की, “मी अनेक वर्षांपासून रोहित शर्मा याला मुंबई इंडियन्स संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहिले आहे. आता मुंबई इंडियन्सच्या महिला संघाच्या नेतृत्वाची संधी मला मिळाली आहे. मी माझे 100 टक्के योगदान देईल. ज्याप्रकारे पुरुषांच्या संघाने कामगिरी केली होती, तशीच कामगिरी महिला संघही करेल.”

विशेष म्हणजे, पदार्पणाच्या हंगामात हरमनप्रीत कौर हिने मुंबई इंडियन्स महिला संघाला डब्ल्यूपीएल 2023 (WPL 2023) स्पर्धेचे विजेतेपद जिंकून दिले. खरं तर, जेव्हा रोहितने आयपीएल 2013च्या हंगामात पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले होते, तेव्हा त्याने पदार्पणाच्या हंगामातच संघाला विजेतेपद जिंकून दिले होते. त्यानंतर त्याने मुंबईला 2015, 2017, 2019 आणि 2020 अशाप्रकारे पाच विजेतेपद जिंकून दिले. महत्त्वाचं म्हणजे, मुंबई हा आयपीएलचा 5 विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1640043167473975302

सामन्याचा आढावा
डब्ल्यूपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी दिल्लीने फलंदाजी करत 20 षटकात 9 विकेट्स गमावत 131 धावा केल्या होत्या. मुंबईने नॅट सायव्हर-ब्रंट हिच्या नाबाद 60 धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर 19.3 षटकात 134 धावा केल्या. तसेच, 7 विकेट्सने हा सामना खिशात घातला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 37 धावांचे योगदान दिले होते. (Mumbai Indians Captain Harmanpreet Kaur won wpl tital before wpl talked about rohit sharma legacy)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या हेलीचा नाद पराक्रम! 3 विकेट्स काढताच बनली WPLमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज
दक्षिण आफ्रिकेने घडवला इतिहास! टी20 मध्ये पार केले 259 धावांचे आव्हान, डी कॉकचे वादळी शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---