इंडियन प्रीमिअर लीग 2023मधील 49वा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात शनिवारी (दि. 6 मे) पार पडला. या सामन्यात पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन चेन्नईने चार वेळच्या चॅम्पियन मुंबईला 6 विकेट्सने धूळ चारली. या सामन्यात मुंबईचे गोलंदाज आणि फलंदाजांनी खास प्रदर्शन करू शकले नाहीत. मुंबईने चेन्नईला विजयासाठी 140 धावांचे आव्हान दिले होते, जे चेन्नईने सहजरीत्या गाठले. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले. या पराभवानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने पराभवाचे मोठे कारणही सांगितले.
रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया
चेन्नईविरुद्ध 6 विकेट्सने सामना गमावताच रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. गोलंदाजांना बचाव करण्यासाठी मोठे आव्हान मिळाले नव्हते. आमच्या फलंदाजीसाठी हा एक खराब दिवस होता.” तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याबद्दल तो म्हणाला की, “आम्ही तेच केले, जे आम्हाला ठीक वाटले. आम्हाला मधल्या फळीत एक भारतीय फलंदाजाची गरज होती. दुर्दैवाने तिलक वर्मा बाहेर असल्यामुळे आम्हाला फिरकीविरुद्ध शानदार फलंदाजी करण्याची गरज होती.”
पीयुष चावलाचे कौतुक
रोहित शर्मा याने पुढे बोलताना म्हटले की, “आम्ही फक्त 16 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. पीयुष चावला चांगली गोलंदाजी करत आहे. दुसऱ्या गोलंदाजांना त्याच्यासोबत येण्याची गरज आहे. सर्वांना पुढे यावे लागेल आणि योगदान द्यावे लागेल. या हंगामात घरच्या मैदानाचा जास्त फायदा मिळत नाहीये. स्पर्धेत प्रत्येकजण पराभूत आणि विजयी होत आहे. आम्हाला खेळाच्या तिन्ही विभागात चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. पुढील दोन्ही सामने आम्हाला घरच्याच मैदानावर खेळायचे आहेत.”
Captain @msdhoni gently pushes one for a single to hit the winning runs 😃@ChennaiIPL register a comfortable victory over #MI at home 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/hpXamvn55U #TATAIPL | #CSKvMI pic.twitter.com/SCDN047IVk
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
मुंबईचा दारुण पराभव
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 139 धावा केल्या होत्या. मुंबईसाठी सर्वाधिक धावा नेहाल वढेरा याने केल्या. त्याने यावेळी 51 चेंडूत 64 धावांची खेळी साकारली. यामध्ये 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे मुंबई संघ लहान आव्हान उभे करू शकला. चेन्नईकडून यावेळी गोलंदाजी करताना मथीशा पथिराना याने धमाकेदार प्रदर्शन करत 4 षटकात 15 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनीही शानदार फटकेबाजी केली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 30 आणि डेवॉन कॉनवे याने 44 धावांचे योगदान दिले. डावातील 18व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर एमएस धोनी याने 1 धाव काढून संघाला 6 विजयी केले. (mumbai indians captain rohit sharma after defeat match against csk ipl 2023 read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
50- 50 आणि 50! विराटने जुळवला ‘हा’ अनोखा योगायोग, वाचून तुम्हीही कराल कौतुक
विक्रमी 7 हजार धावा करताना विराटने ‘या’ संघाविरुद्ध चोपल्या सर्वाधिक धावा, बलाढ्य CSK दुसऱ्या स्थानी