इंडियन प्रीमिअर लीग 2023 मध्ये शनिवारी (8 एप्रिल) दुसरा सामना सायंकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडियम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. या सामन्यात सर्वांना अटीतटीच्या लढतीची अपेक्षा होती. मात्र, चेन्नईने मुंबईला एकतर्फी पराभूत करत हंगामातील दुसरा विजय साजरा केला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच व्यतीथ झाला.
हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला आरसीबीकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे घरच्या मैदानावर विजयाच्या इराद्याने मुंबईचा संघ उतरला होता. मात्र, चेन्नईने त्यांना कोणती संधी दिली नाही. खेळाच्या तिन्ही विभागात चेन्नईने सरस कामगिरी करत मुंबईचा सात गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर बोलताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,
“चांगल्या सुरुवातीनंतर खेळाच्या मधल्या भागात आम्ही सामना गमावला. मला वाटते आम्ही 30-40 धावा कमी केल्या होत्या. मात्र, दरवेळी पराभवाचे कारण देता येत नाही. अनुभवी खेळाडूंनी आता जबाबदारी घ्यायला हवी. नक्कीच याची सुरुवात माझ्यापासून होईल.”
तो पुढे बोलताना म्हणाला,
“आयपीएलचा फॉरमॅट असा आहे की, तुम्हाला पुनरागमन करण्याची संधी असते. आता दोनच सामने झाले आहेत. एकदा तुम्ही विजयी मार्गावर परतला की तुम्हाला त्याची सवय होते. आमच्या संघाने यापूर्वी देखील हे करून दाखवले आहे.”
या सामन्यात स्वतः रोहित चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवू शकला नव्हता. 13 चेंडूवर 21 धावा काढताना त्याने तीन चौकार व एक षटकार लगावलेला. मात्र, चौथ्या षटकात तो बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव घसरला. त्यामुळे मुंबई निर्धारित 20 षटकात केवळ 157 पर्यंत मजल मारू शकलेली.
(Mumbai Indians Captain Rohit Sharma Said Senior Players Need To Take Responsibility)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वानखेडेवर ‘अजिंक्य’चा झंझावात! झळकावले आयपीएल 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतक
मुंबई-चेन्नई ‘काँटे की टक्कर’ सामन्यात सीएसकेच्या खेळाडूचा डोळ्याचे पारणे फेडणारा भन्नाट कॅच! बघा तो व्हिडिओ