इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज मार्क बाऊचर मुंबई इंडियन्स संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील आहे. बाऊचर मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. माहेला जयवर्धनेच्या जागी त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याने हंगाम सुरू होण्यापूर्वी हे स्पष्ट करण्यात आले आहे की, त्याचा संघ फक्त प्ले-ऑफमध्ये जागा बनवण्यासाठी नाही, तर चॅम्पियन बनण्यासाठी आला आहे.
मार्क बाऊचर (Mark Boucher) याने दीर्घ काळ दक्षिण आफ्रिका संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. त्याला खेळाडूंसोबत काम करण्याचा चांगला अनुभव आहे. याव्यतिरिक्त तो आयपीएलमध्येही खेळला आहे. त्यामुळे त्याला येथील परिस्थितीची माहिती आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेपूर्वी माध्यमांशी बोलताना मार्क बाऊचर याने प्रशिक्षक म्हणून आपले ध्येय सांगितले. तो म्हणाला की, “मला ट्रॉफी जिंकायची आहे. मी इथे तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर पोहोचण्यासाठी आलो नाहीये. मला जिंकायचे आहे. हीच संधी आहे. याच दृष्टिकोनातून मला सर्वांकडून पाठिंबा मिळाला आहे. हे शानदार आहे.”
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2023
रोहितसोबत पहिल्यांदा करणार काम
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत पहिल्यांदाच काम करण्याबाबतही बाऊचरने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “जेव्हा मी पहिल्यांदा रोहितविरुद्ध खेळलो होतो, तेव्हा मी एक यष्टीरक्षक होतो. मी म्हणालो, ‘या मुलाला खेळण्यासाठी इतका वेळ लागला आहे.’ हे सर्व एकमेकांकडून शिकण्याबाबत आहे. मी कोणत्याही प्रकारे त्याच्यावरील दबाव हटवेल, ज्यामुळे त्याला बाहेर जाऊन आपल्या कौशल्य व्यक्त करण्याची संधी मिळेल. मी फक्त त्याच्यासाठी एक चांगला हंगाम ठरण्याची अपेक्षा करत आहे. तसेच, आव्हानाची वाट पाहत आहे.”
खरं तर, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणार आहे. मागील हंगामात संघाने खूपच खराब प्रदर्शन केले होते. त्यानंतर त्यांचे लक्ष या हंगामाचा किताब पटकावण्यावर असेल. यासोबत हेदेखील पाहावे लागेल की, मार्क बाऊचर या संघाला माहेला जयवर्धने याच्याप्रमाणे यश मिळवून देतो की नाही. (mumbai indians coach mark boucher on winning ipl trophy 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने घेतली 2 सार्वकालीन महान खेळाडूंची नावे; एक सचिन, पण दुसरा कोण? घ्या जाणून
यापूर्वी खेळलेल्या गुजरात-चेन्नईमधील 2 सामन्यात कोण कुणावर भारी? वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास