---Advertisement---

षटकार ठोकत मुंबईने जिंकला सामना, सूर्या-नेहाल ठरले मॅच विनर, गुणतालिकेत मोठा फेरबदल

On: मंगळवार, मे 9, 2023 11:16 PM
Suryakumar Yadav Nehal Wadhera
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 200 धावांचे लक्ष्य मिळाले होते. सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांच्या वादळी खेळीमुळे मुंबने हे लक्ष्य 6 विकेट्स राखून गाठले. चालू हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा 6वा विजय ठरला, तर दुसरीकडे आरसीबीचा 6वा पराभव ठरला. सूर्यकुमार यादव खऱ्या अर्धाने मॅच विनर ठरला. सूर्याच्या बॅटमधून 35 चेंडूत 83 धावा केल्या. 

आरसीबीने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षटकांमध्ये आरसीबीने 6 बाद 199 धावा कुटल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी धमाकेदार खेळी केल्यामुळे आरसीबीला चांगली सुरुवात मिळाली आणि संघ मोठी धावसंख्या करू शकला. सलामीवीर विराट कोहली आणि तिसऱ्या क्रमावरील अनुज रावत स्वस्तात बाद झाले. विराटने 1, तर रावतने 6 धावांवर विकेट गमावल्या. दुसरीकडे डू प्लेसिसने 41 चेंडूत 65, तर मॅक्सवेलने 33 चेंडूत 68 धावा कुटल्या.

मुंबईसाठी सामन्याचा शेवट सूर्यकुमार यादव करेल असे वाटत होते. मात्र 16 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने केदार जाधवच्या हातात झेल दिला. विजयकुमार वैशाख या षटकात गोलंदाजी करत होता. सूर्यकुमारला नेहाल वढेरा याने चांगली साध दिली. नेहालने 34 चेंडूत 52* धावा कुटल्या. मुंबईसाठी विजयी षटकार देखील नेहालच्याच बॅटमधून निघाला. मुंबईचा सलामीवीर ईशान किशन याने 21 चेंडूत 42 धावा दिल्या.

आरसीबीसाठी वानिंदू हसरंगा आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. मुंबईच्या गोलंदाजी आक्रमणात जेसन बेहरनडॉर्फ याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कॅमरून ग्रीन, ख्रिस जॉर्डन आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

(Mumbai Indians defeated RCB on the strength of Suryakumar Yadav’s storming innings)
बातमी अपडेट होत आहे…

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवीन उल हकचा खोडसाळपणा! विराटची विकेट पडताच इंस्टावर शेअर केलेली ‘ती’ स्टोरी चर्चेत
फाफने मुंबईविरुद्ध पार केला मैलाचा दगड! भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी अवघ्या 27 सामन्यात दाखवली करून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---