---Advertisement---

RCB vs MI; हरमनप्रीत कौरचे शानदार अर्धशतक! मुंबईचा सलग दुसरा विजय

On: शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2025 11:14 PM
---Advertisement---

महिला प्रीमियर लीगच्या (Women Premier League 2025) सातव्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 4 विकेट्सने पराभव केला. यासह, मुंबईला आरसीबीचा विजयी रथ रोखण्यात यश आलं आहे. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) शानदार अर्धशतक झळकावले. दरम्यान तिने 50 धावा केल्या. अमनजोत कौरने 34 धावांची नाबाद खेळी करत मुंबईचा विजय निश्चित केला. मुंबईने या स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.

बंगगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 167 धावा केल्या. खराब सुरुवात असूनही बंगळुरूला मोठी धावसंख्या गाठण्यात यश आले. आरसीबीसाठी सर्वात मोठी खेळी एलिसे पेरीने खेळली, दरम्यान तिने 81 धावा केल्या.

पेरीच्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. पेरी आता महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनण्यापासून फक्त 32 धावा दूर आहे. मुंबईविरुद्धच्या तिच्या 81 धावांच्या खेळीदरम्यान, तिने तिच्या डब्ल्यूपीएलच्या कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले.

महत्त्वाच्या बातम्या-

AFG vs SA: रायन रिकेल्टनचे शानदार शतक! आफ्रिकेची विजयी सलामी
Ind vs Pak: “आम्ही दुबईत भारताला दोनदा हरवले” सामन्यापूर्वीच पाकिस्तानी खेळाडूचे मोठे वक्तव्य!
Champions Trophy; भारत-पाकिस्तान सामन्यात कोण मारणार बाजी? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---