गिर्यारोहक नीमा रिंजी शेर्पा हिनं जगातील तिसरं सर्वोच्च शिखर सर केलं आहे. विशेष म्हणजे, तेथे जाऊन तिनं मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकवला! निमा रिंजी शेर्पा हिनं अलीकडेच मुंबई इंडियन्सचे क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची भेट घेतली होती. या दरम्यान तिनं रोहित आणि सूर्या यांना तिच्या प्रवासाबद्दल सांगितलं होतं.
नीमा रिंजी शेर्पाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती हातात मुंबई इंडियन्सचा झेंडा घेऊन दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2024 दरम्यान नीमा रिंजी शेर्पानं मुंबई इंडियन्सचे क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी तिच्या उत्साहाचं कौतुक केलं होतं. सोशल मीडिया यूजर्स नीमा रिंजी शेर्पा हिच्या पोस्टवर सातत्यानं कमेंट करत आहेत. तुम्ही हा फोटो येथे पाहू शकता.
The Mountaineer, Nima Rinji Sherpa, who had a chat with Rohit Sharma & Surya Kumar Yadav about his journey in life during IPL – as the honour for their support & encouragement, he took the Mumbai Indians flag to the third highest peak in the world. 🫡 pic.twitter.com/KlDMo5H50Z
— Johns. (@CricCrazyJohns) June 16, 2024
आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. मुंबई इंडियन्सची टीम गुणतालिकेत तळाच्या स्थानी राहिली. वास्तविक, यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माच्या हटवून त्याच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं होतं. मात्र मुंबई इंडियन्सचा हा निर्णय अजून तरी योग्य ठरलेला नाही.
मुंबईच्या चाहत्यांनी देखील हा निर्णय आवडला नाही आणि त्यामुळे हार्दिक पांड्याही खूप ट्रोल झाला. याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला. स्वत: हार्दिक पांड्या देखील त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. आता आगामी मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात काय बदल होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानचा आयर्लंडवर 3 गडी राखून दणदणीत विजय
“वादळ येण्यापूर्वीची शांतता…” कोहलीच्या फाॅर्मबद्दल ‘या’ दिग्गज खेळाडूनं दिली भन्नाट प्रतिक्रिया
‘रिटायर्ड हर्ट’ आणि ‘रिटायर्ड आऊट’ यात फरक काय? नामिबियाच्या कर्णधाराच्या नावावर विश्वविक्रम का नोंदला गेला?