आयपीएल 2025 स्पर्धेतील 56 वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळला जात आहे. या सामन्यात गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. व मुंबईला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करत मुंबईने गुजरातला जिंकण्यासाठी 156 धावांचं आव्हान दिलेलं आहे.
सलग सहा सामने जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची आज सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिराजने रिकल्टनला बाद केले. मुंबईसाठी फलंदाजी करताना सर्वाधिक धावा फक्त विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादवने केल्या. विल जॅक्सने 35 चेंडूत 53 धावा करत तसेच सूर्याने 24 चेंडूत 35 धावा केल्या. याशिवाय मुंबईसाठी कोणीही प्रभावी कामगिरी करू शकले नाही.
रोहित शर्मा (7), हार्दिक पांड्या (1), तिलक वर्मा (7) अश्या कामगिरीने मुंबईने वीस षटकात 155 धावा करत 8 खेळाडू गमावले.
गुजरातचे सर्व गोलंदाज आज मुंबईच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरले. त्यांनी सुरुवातीपासूनच मुंबईला लयीमध्ये खेळू दिले नाही. गुजरातसाठी साई किशोरने 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय सर्व गोलंदाजांनी 1- 1 विकेट्स घेतली.
गुजरातने संपूर्ण हंगामात शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता मुंबई त्यांना हे आव्हान पूर्ण करण्यापासून थांबवू शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.