---Advertisement---

रोहित-विराट इंग्लंड दौऱ्यावर जाणार? जाणून घ्या काय म्हणाले प्रशिक्षक गंभीर!

On: मंगळवार, मे 6, 2025 5:55 PM
---Advertisement---

भारतात सध्या आयपीएल 2025 स्पर्धेचा रोमांच पाहायला मिळत आहेत. ज्या नंतर टीम इंडियाला इंग्लंडचा दौरा करायचा आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. आतापासूनच चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामध्येच एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे, इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ कसा असेल? रोहित-विराटच्या कसोटी संघातील जागेवर प्रश्न निर्माण होत आहेत. आता एबीपी न्यूजशी बोलताना म्हटले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत का?

गौतम गंभीर यांनी म्हटले की, रोहित शर्मा किंवा विराट कोहली यांना संघात स्थान देणे त्यांच्या हातात नाही. कारण संघाची निवड निवड सिलेक्शन कमिटी करते. गंभीरने सांगितले की, एक प्रशिक्षक म्हणून त्यांचे काम फक्त संघात चांगली प्लेइंग इलेव्हन तयार करणे आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, हे जे समज झाले आहेत की प्रशिक्षक संघ तयार करतो,या विचाराला संपवले पाहिजे. ना माझ्या आधी कोणताही प्रशिक्षक संघाची निवड करत होता, ना आता मी करतो. या प्रश्नाचे उत्तर माझ्या तुलनेत निवडकर्ते चांगल्या प्रकारे देऊ शकले असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---