आगामी इंडियन प्रीमियर लीगसाठीचा (Indian Premier League) मेगा लिलाव (Mega Auction) सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरू आहे. त्यातील आज (25 नोव्हेंबर) दुसरा दिवस आहे. यंदाच्या मेगा लिलावात अनेक रेकाॅर्ड तुटले गेले. काही दिग्गज खेळांडूंवर विक्रमी बोली लागली. दरम्यान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (Royal Challengers Bangalore) शेवटच्या हंगामात झंझावाती शतक ठोकणाऱ्या विल जॅक्सला (Will Jacks) चॅम्पियन्स संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) खरेदी केले आहे.
विल जॅक्चचे (Will Jacks) नाव लिलावात आल्यानंतर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याच्यावर बोली लावली. पण सर्वांच्या नजरा आरसीबीच्या मॅनेजमेंटवर होत्या. कारण आरसीबीकडे आरटीएम (RTM) कार्ड उपलब्ध होते. पण आरसीबीने आरटीएम कार्डचा वापर केला नाही. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मुंबईने विल जॅक्सला 5.25 कोटी रूपयात आपल्या संघात सामील केले. विल जॅक्सचा मुंबई संघात समावेश झाल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे.
विल जॅक्सच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने शेवटच्या आयपीएल हंगामात आरसीबीसाठी पदार्पण केले होते. त्याने आयपीएलमध्ये 8 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 32.86च्या सरासरीने फलंदाजी करताना 230 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 175.57 राहिला आहे. आयपीएलमध्ये त्याने 1 अर्धशतकासह 1 शतक देखील झळकावले आहे. पण आता आगामी आयपीएल हंगामात तो मुंबईसाठी खेळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Mega Auction; मुंबईसाठी मैदान गाजवणारा खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात सामील
क्रुणाल पांड्यावर लिलावात लागली कोटींची बोली! ‘या’ संघातून खेळताना दिसणार
IPL 2025 : सॅम करनचा सीएसकेत कमबॅक, फाफ डू प्लेसिससोबत गेम झाला!