---Advertisement---

IPL: एकाच मैदानावर धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सामने जिंकणारे 3 संघ, चॅम्पियन संघाचा मोठा पराक्रम

On: शुक्रवार, एप्रिल 18, 2025 2:46 PM
---Advertisement---

सध्या आयपीएलचा 18वा हंगाम सुरू आहे. त्यामध्ये गुरुवारी (17 एप्रिल), 33व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 4 गडी राखून धुव्वा उडवला. यंदाचा आयपीएल हंगाम सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्ससाठी एवढा खास राहिला नाही, परंतु, मुंबईने गेल्या 2 सामन्यांमध्ये सलग विजय मिळवले आहेत. मुंबई आता गुणतालिकेत वरच्या स्थानी सरकत आहे. सनरायझर्स हैदराबाद आतापर्यंत 7 सामन्यात 2 विजयांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.

हैदराबादचा धुव्वा उडवून मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) वानखेडेवर धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवण्याचा रेकाॅर्ड केला आहे. आयपीएलमध्ये एकाच मैदानावर धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवणारे टॉप 3 संघ कोणते? चला तर या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया.

1) मुंबई इंडियन्स 29 विजय (वानखेडे)- वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने (MI) आतापर्यंत 47 आयपीएल सामन्यांमध्ये लक्ष्यांचा पाठलाग केला आहे. या मैदानावर धावांचा पाठलाग करताना मुंबईने सर्वाधिक वेळा विजय मिळवला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली, मुंबईने आयपीएल 2025च्या 33व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 4 विकेट्सने पराभव केला आणि या मैदानावर धावांचा पाठलाग करताना त्यांचा 29वा विजय नोंदवला.

2) कोलकाता नाईट रायडर्स 28 विजय (ईडन गार्डन्स)- कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आतापर्यंत कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर 40 आयपीएल सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग केला आहे. दरम्यान केकेआरला 28 वेळा विजय मिळवता आला आहे. केकेआरने हा रेकाॅर्ड आयपीएल 2024 मध्ये 47व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव करून केला होता.

3) राजस्थान रॉयल्स- 24 विजय (जयपूर)- आयपीएलमध्ये, राजस्थान रॉयल्सने (RR) जयपूरमधील त्यांच्या घरच्या मैदानावर सवाई मानसिंग स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 31 आयपीएल सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग केला आहे. दरम्यान, राजस्थानने 24 सामने जिंकले आहेत. शेवटच्या आयपीएल हंगामात राजस्थानने लीग टप्प्यातील 38व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 विकेट्सने हा सामना जिंकला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---