---Advertisement---

IPL 2023च्या 63व्या सामन्यात मुंबईने जिंकला टॉस, कृणालसेना करणार बॅटिंग

Lucknow-Super-Giants
---Advertisement---

लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर आयपीएल 2023चा 63वा सामना लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. मंगळवारी (दि. 16 मे) खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी 7 वाजता लखनऊ विरुद्ध मुंबई संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विजय मिळवून मुंबई संघ प्ले-ऑफच्या जवळ जाता येईल.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ एक बदलासह मैदानात उतरणार आहे. तसेच, संघ 4 वेगवान आणि 2 फिरकीपटूंना खेळवणार आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्स संघातही बदल झाले आहेत. नवीन उल हक आणि दीपक हुड्डा संघात परतले आहेत. तसेच, काईल मेयर्स आणि आवेश खान यांसारखे महत्त्वाचे खेळाडू संघातून बाहेर आहेत. मात्र, यापैकी मेयर्सला सब्स्टिट्यूट म्हणून घेतलं आहे. संघात आणखी एक बदल आहे, पण त्याबाबत विसरल्याचे कृणालने सांगितले.

https://twitter.com/IPL/status/1658467294287388676

हंगामातील कामगिरी
मुंबई इंडियन्स संघाने लखनऊला भिडण्यापूर्वी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. या सामन्यांपैकी 7 सामने मुंबईने जिंकले आहेत. तसेच, उर्वरित 5 सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. 7 विजयासह 14 गुण मिळवत मुंबई गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

तसेच, लखनऊ संघाने मुंबईविरुद्ध भिडण्यापूर्वी या हंगामात 12 सामने खेळले आहेत. यापैकी 6 सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे, तर 5 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना अनिर्णित ठरल्यामुळे लखनऊला 1 गुण मिळाला. यासोबत 13 गुणांसह लखनऊ गुणतालिकेत चौथ्या स्थानी विराजमान आहे. आता हा सामना जिंकत दोन्ही संघ प्ले-ऑफच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतील. (Mumbai Indians have won the toss and have opted to field against Lucknow Super Giants)

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
लखनऊ सुपर जायंट्स
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, नवीन उल हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान

मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, टीम डेविड, ऋतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘वरिष्ठांचा आदर करा’, गंभीर अन् रोहितच्या व्हिडिओवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट; लगेच पाहा
‘जेव्हा क्रिकेट कळायला लागले, तेव्हापासून विराटच माझ्यासाठी…’, शतक झळकावल्यानंतर गिलचे मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---