अर्धा टप्पा पार करणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 54वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने उभ ठाकणार आहेत. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, 7 वाजता मुंबई विरुद्ध बेंगलोर संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकून दोन्ही संघ गुणतालिकेतील आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करतील.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात मोठा बदल झाला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) संघातून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी ख्रिस जॉर्डन याला संघात जागा मिळाली आहे. जॉर्डन मुंबईसाठी पदार्पण करत आहे. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघातही महत्त्वाचा बदल झाला आहे. कर्ण शर्मा याच्या जागी संघात विजयकुमार वैशाक याची एन्ट्री झाली आहे.
🚨 Toss Update from Wankhede Stadium 🚨@ImRo45 has won the toss & @mipaltan have elected to bowl against the @faf1307-led @RCBTweets.
Follow the match ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/S17myQaEgc
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023
हंगामातील कामगिरी
मुंबई इंडियन्स संघाने या हंगामात आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यातील 5 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे, तर उर्वरित 5 सामन्यात मुंबईला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघानेही 10 सामने खेळले आहेत. आरसीबीनेही 5 सामन्यात विजय आणि 5 सामन्यात पराभव पत्करला आहे. मात्र, गुण जरी सारखेच असले, तरीही गुणतालिकेतील दोन्ही संघांचे स्थान वेगळे आहे. आरसीबी संघ सहाव्या स्थानी आहे, तर मुंबई संघ आठव्या स्थानी आहे. या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. (Mumbai Indians have won the toss and have opted to field against rcb ipl 2023)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेविड, नेहाल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार वैशाक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवूड
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या 16 वर्षांखालील खेळाडूंना मिळाले रिषभ पंतचे मार्गदर्शन, एनसीएत झाली भेट
‘गोलंदाजाला कुणी बोललं तर राग…’, फिल सॉल्टशी झालेल्या बाचाबाचीवर सिराजचा मोठा खुलासा