पंजाब किंग्जविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्सने हंगामातला त्यांचा सलग पाचवा सामना गमावला आहे. बुधवारी (१३ एप्रिल) पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने १२ धावांनी विजय मिळवला. तसे पाहिले, तर मुंबईचा संघ आयपीएल हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षित प्रदर्शन करू न शकण्याची ही पहिली वेळ नाहीये. आधीही संघाने हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खराब प्रदर्शन करून नंतर चांगला खेळ दाखवला आहे.
आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांनी स्वतःचे सुरुवातीचे सलग ४ सामने गमावले होते. मंगळवारी (१२ एप्रिल) सीएसकेने आरसीबीला २३ धावांनी धूळ चारली आणि हंगामातील त्यांचा पहिला विजय मिळवला, पण मुंबई इंडियन्सने मात्र त्यांचा पाचवा सामना देखील गमावला. ही पाचवी वेळ आहे, जेव्हा एखाद्या संघाने आयपीएल हंगामातील त्यांचे सुरुवातीचे सलग ५ सामने गमावले असतील. मुंबई इंडियन्सचे नाव या यादीत दोन वेळा येते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आयपीएल २०१२मध्ये डेक्कन चार्जर्सने हंगामातील सुरुवातीच्या सलग पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करला होता. चाहत्यांसाठी ही पहिलीच वेळ होती, जेव्हा एखाद्या संघाने हंगामाच्या सुरुवातीला सलग पाच पराभव पत्करले होते. त्यानंतर २०१३ हंगामात दिल्ली कॅपिटल्सने ही नकोशी कामगिरी पुन्हा प्रत्यक्षात उतरवली. आयपीएल २०१४मध्ये मुंबई इंडियन्सच्या नावावर ही नकोशी कामगिरी पहिल्यांदा नोंदवली गेली. त्यानंतर २०१९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चालू हंगामात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने त्यांचे सुरुवातीचे सलग पाच सामने गमावले आहेत.
दरम्यान, मुंबई आणि पंजाब (MI vs PBKS) यांच्यात बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यावर नजर टाकली, तर मुंबईच्या फलंदाजांनी पूर्ण प्रयत्न करून देखील त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने ५ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स ९ विकेट्सच्या नुकसानावर १८६ धावा करता आल्या. परिणामी पंजाबाने १२ धावांनी विजय मिळवला.
आयपीएल हंगामातील सुरुवातचे सलग ५ सामने गमावणारे संघ
२०१२- डेक्कन चार्जर्स
२०१३- दिल्ली कॅपिटल्स
२०१४- मुंबई इंडियन्स
२०१९- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०२२- मुंबई इंडियन्स*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबविरुद्ध ‘हिटमॅन’ने केल्या फक्त २७ धावा, पण नावावर जबरदस्त विक्रमाची नोंद
MI vs PKBS | रंगतदार सामन्यात अखेरच्या षटकात पंजाब विजयी, मुंबईचा सलग ५वा पराभव