---Advertisement---

पोलार्ड आणि मुंबई इंडियन्सचे नाते संपुष्टात? 13 वर्षांनंतर सोडणार संघाची साथ

On: शनिवार, नोव्हेंबर 12, 2022 1:32 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. रविवारी (13 नोव्हेंबर) स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तान व इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला जाईल. विश्वचषकानंतर अवघ्या दोनच दिवसांनी जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल 2023) बिगुल वाजणार आहे. आयपीएल 2023 साठी आपल्या संघाकडे राखून ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. त्याच संदर्भात आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

आयपीएल 2023 साठी सर्व संघांना आगामी हंगामासाठी कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्यायची आहे.‌ या आयपीएल रिटेन्शनबाबत सध्या अनेक बातम्या समोर येतायेत. मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स या संघांनी आपल्या याद्या जमादेखील केल्याचे सांगितले जातेय.

त्याचवेळी पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सने वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार व अष्टपैलू कायरन पोलार्ड याला संघातून रिलीज केल्याचे सांगण्यात येतेय. माध्यमांतील वृत्तानुसार, मुंबईने पोलार्डला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. संघात डेवाल्ड ब्रेविस, टीम डेव्हिड व ट्रिस्टन स्टब्स हे युवा आक्रमक फलंदाज असल्याने आता 35 वर्षीय पोलार्डला मुंबईने नारळ दिला. त्यामुळे तो डिसेंबर महिन्यात होणाऱ्या मिनी लिलावात दिसून येईल.

पोलार्ड हा मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. मुंबईने जिंकलेल्या पाचही आयपीएल विजेतेपदात त्याचा सिंहाचा वाटा होता. त्याने 2010 ते 2022 असे तब्बल तेरा हंगाम मुंबईसाठी खेळताना 189 सामन्यात 3412 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 28.67 तर स्ट्राईक रेट 147 इतका जबरदस्त राहिला. यासोबतच 69 बळी देखील त्याने आयपीएलमध्ये टिपले आहेत. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो संघाचे नेतृत्व देखील करताना दिसत.

(Mumbai Indians Likely Released Kieron Pollard After 13 Years)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी: आयसीसीला मिळाला नवा अध्यक्ष! ‘या’ व्यक्तीची बिनविरोध निवड
संदीप लामिछानेनंतर 46 आतंरराष्ट्रीय सामने खेळणारा करणार नेपाळचे नेतृत्व, टी20मध्ये विकेट्सही घेतल्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---