मुंबई इंडियन्सनं महिला प्रीमियर लीग 2025 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. संघानं कर्णधार हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, नॅट सायव्हर-ब्रंट आणि पूजा वस्त्राकर यांच्यासह 14 खेळाडूंना रिटेन केलं. यामध्ये भारतीय तसेच परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. संजना सजीवन आणि सायका इशाक यांचाही रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ खूपच संतुलित दिसत आहे.
मुंबई इंडियन्सनं केवळ 4 खेळाडूंना रिलिज केलं. संघानं प्रियांका बाला, फातिमा जफर, हुमैरा काझी आणि इसी वाँग यांना रिलीज केलं आहे. रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये नॅट सायव्हर, हीली मॅथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन आणि अमनजोत कौर यांचा समावेश आहे. टीमच्या पर्सबद्दल बोलायचं झालं तर, सध्या संघाकडे 2.65 कोटी रुपये शिल्लक आहेत.
मुंबईनं महिला आयपीएलसाठी 9 भारतीय खेळाडूंना रिटेन केलं. यामध्ये हरमनप्रीत कौर, अमनदीप कौर, अमनजोत कौर, कीर्तन बालकृष्णन, जिंतीमणी कलिता, पूजा वस्त्राकार, सायका इशाक, सजना सजीवन आणि यास्तिका भाटिया यांचा समावेश आहे. संघानं न्यूझीलंडच्या एका तसेच दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना कायम ठेवलं आहे.
मुंबई इंडियन्सनं रिटेन केलेले खेळाडू – हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, नट साइवर-ब्रंट, हीली मॅथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, अमनजोत कौर, सैका इशाक, जिंतिमनी कलिता, एस सजना, कीर्तन बालाकृष्णन, शबनीम इस्माइल
रिलीज केलेले खेळाडू – प्रियंका बाला, हुमैरा काझी, फातिमा जाफर, इस्सी वोंग
पर्समधील शिल्लक रक्कम – 2.65 कोटी रुपये
मुंबई इंडियन्सनं WPL 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली होती. संघानं 8 पैकी 5 सामने जिंकले तर 3 सामन्यांत पराभव पाहिला. मुंबईचा संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. मात्र, एलिमिनेटर सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं त्यांना 5 धावांनी पराभूत केलं होतं.
हेही वाचा –
मेगा लिलावात आरसीबीनं या 4 खेळाडूंवर हमखास बोली लावावी, एबी डिव्हिलियर्सचा मोलाचा सल्ला
“लिलावात 25-26 कोटी!!”, हा असेल आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; आकाश चोप्रांची भविष्यवाणी
“रचिन रवींद्रनं सीएसकेसोबत मिळून भारताविरुद्ध तयारी केली होती”, माजी खेळाडूचा गंभीर आरोप