मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद, या दोन्ही संघांनी आयपीएलच्या चालू हंगामात प्रत्येकी चार-चार सामने खेळले आहेत. या चार पैकी दोन-दोन सामने दोन्ही संघांनी जिंकले आहेत. मंगळवारी (18 एप्रिल) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई आणि हैदराबाद संघ आमने सामने असणार आहेत. मात्र, या सामन्यातून मुंबईचा युवा अष्टपैलू व मागील सामन्यात पदार्पण केलेल्या अर्जुन तेंडुलकर याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा असलेल्या अर्जुनने मागील सामन्यात केकेआरविरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. आपल्या पहिल्या सामन्यात त्याने दोन षटके गोलंदाजी करताना 17 धावा त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. हा सामना मुंबईने एकतर्फी आपल्या नावे केला होता.
त्यानंतर आता मुंबईला आपला पुढील सामना हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळवून मुंबई विजयाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असेल. त्याचवेळी भारताचा माजी सलामीवीर व समालोचक आकाश चोप्रा याने मुंबई या सामन्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल करू शकते असे म्हटले. त्याने म्हटल्याप्रमाणे,
“मुंबईची फलंदाजी माझ्यानुसार आहे तशीच राहील. मात्र, गोलंदाजी आक्रमण मागील सामन्यापेक्षा बरेच निराळे असू शकते. या सामन्यात डुआन जेन्सन व अर्जुन तेंडुलकर हे खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी जोफ्रा आर्चर व जेसन बेहरेनडॉर्फ यांच्यापैकी एक जण खेळेल. फिरकी गोलंदाजीत कुमार कार्तिकेय याला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.”
मागील तीन सामन्यांना दुखापतीमुळे मुकलेला आर्चर या सामन्यात खेळण्याचे संकेत मिळाले होते. तसेच, मागील सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानावर आलेला नियमित कर्णधार रोहित शर्मा यावेळी पुन्हा एकदा नाणेफेकीसाठी दिसेल.
(Mumbai Indians Might Dropped Arjun Tendulkar Against Sunrisers Hyderabad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नो-बॉलचा मारा करताच पंचांनी हर्षलला गोलंदाजी करण्यापासून का रोखले? ‘हे’ आहे कारण
आयपीएल 2023मधून मोठी बातमी! LSG vs CSK सामन्याच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या कारण