---Advertisement---

आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च? सोशल मीडियावरील दाव्यामागची कहाणी जाणून घ्या

On: गुरूवार, डिसेंबर 12, 2024 6:13 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्स ही एक अशी फ्रँचायझी आहे, जिचे देशभरात अनेक चाहते आहेत. आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ही फ्रँचायझी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. काहीवेळा चाहत्यांना या गोष्टी आवडतात, तर कधी कधी या गोष्टी संघाविरुद्धही जातात. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे.

मुंबई इंडियन्सला अगदी जवळून फॉलो करणाऱ्या एका चाहत्यानं इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं संघाची जर्सी लाँच झाल्याचं म्हटलं आहे. या व्यक्तीचे सोशल मीडियावर 60 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचली.

मुंबईच्या अनेक चाहत्यांना ही जर्सी आवडली नाही आणि त्यांनी फ्रँचायझीवर टीका करण्यास सुरुवात केली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मुंबई इंडियन्सनं खरंच नवी जर्सी लॉन्च केली आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो. त्यापूर्वी तुम्ही चाहत्यांच्या काही मजेशीर प्रतिक्रिया जाणून घ्या.

 

 

एक चाहता म्हणाला, “जर मुंबईची ही जर्सी फायनल झाली असेल तर ती आतापर्यंतची सर्वात हास्यास्पद जर्सी असेल. या जर्सीत कोणतंही तेज दिसत नाही.” दुसरा चाहता म्हणाला, “जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या फ्रँचायझींपैकी एक असूनही मुंबई इंडियन्स एक चांगला डिझायनर आणू शकत नाही. अनेक स्थानिक टेनिस बॉल संघ देखील यापेक्षा चांगल्या जर्सीसह खेळतात.”

आता आम्ही तुम्हाला या सर्व घटनेमागची सत्य परिस्थिती सांगतो. वास्तविक, हा जर्सी लॉन्च इव्हेंट नसून स्पॉन्सर लॉन्च इव्हेंट होता. फ्रँचायझीनं त्यांच्या नवीन प्रायोजकांना जर्सीमध्ये स्थान देऊन लोकांसमोर प्रस्तूत केलं आहे. ज्या टी-शर्टवर प्रायोजकांची नावं छापण्यात आली होती, लोकांनी त्या टी-शर्टलाच संघाची अधिकृत जर्सी मानलं. मात्र ही संघाची अधिकृत जर्सी नाही. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सचे खेळाडू आयपीएल 2025 मध्ये हीच जर्सी परिधान करताना दिसतील असं म्हणता येणार नाही.

हेही वाचा – 

‘सिक्सर किंग’ युवराज सिंगची एकूण संपत्ती किती? निवृत्तीनंतरही युवी कुठून कमावतो कोट्यवधी रुपये?
टी20 विश्वचषक विजयापासून रोहित-विराटची निवृत्ती, भारतासाठी कसं राहिलं 2024 हे वर्ष?
गाबा कसोटीसाठी भारतीय संघात होणार अनेक बदल, या दोन खेळाडूंचं बाहेर होणं निश्चित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---