---Advertisement---

तिसऱ्या जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स सज्ज, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि स्कॉड!

On: रविवार, जानेवारी 4, 2026 8:04 PM
---Advertisement---

वुमन्स प्रीमियर लीग 2026 सुरू व्हायला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. काही आठवड्यांपूर्वीच लिलाव पार पडला असून सर्व संघांनी आपला स्क्वाड तयार केला आहे. 9 जानेवारी 2026 पासून या स्पर्धेला सुरुवात होत असून मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना आरसीबी (RCB) विरुद्ध खेळणार आहे.

मुंबई इंडियन्स हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोनदा डब्ल्यूपीएलचे जेतेपद पटकावले आहे आणि आता तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील. चला तर मग, वुमन्स प्रीमियर लीग 2026 साठी मुंबई इंडियन्सचे शेड्यूल्ड (वेळापत्रक) आणि स्क्वाडवर एक नजर टाकूया.

वुमन्स प्रीमियर लीगचा पहिला किताब मुंबई इंडियन्सने आपल्या नावावर केला होता, तर गेल्या वर्षीही मुंबई इंडियन्सचा दबदबा राहिला आणि त्यांनी ट्रॉफी उचलली. WPL मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने आपला मुख्य गाभा (Core Team) कायम ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांना सर्वच खेळाडूंना परत घेता आले नसले तरी त्यांनी एक मजबूत संघ तयार केला आहे.

मुंबई इंडियन्स स्क्वाड 2026: हरमनप्रीत कौर (कर्णधार), जी कमलिनी, पूनम खेमनार, हीली मॅथ्यूज, रहीला फिरदौस (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, मिली इलिंगवर्थ, शबनीम इस्माइल, सायका इशाक, निकोल कॅरी, संस्कृती गुप्ता, त्रिवेणी वशिष्ठ आणि क्रांती रेड्डी.

WPL 2026: मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक

9 जानेवारी 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई)
10 जानेवारी 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई)
13 जानेवारी 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई)
15 जानेवारी 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स (डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई)
17 जानेवारी 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स (डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई)
20 जानेवारी 2026: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (कोटांबी क्रिकेट स्टेडियम, वडोदरा)
26 जानेवारी 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (कोटांबी क्रिकेट स्टेडियम, वडोदरा)
30 जानेवारी 2026: गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (कोटांबी क्रिकेट स्टेडियम, वडोदरा)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---