आयपीएल 2025च्या 45व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात लीग टप्प्यात पहिल्यांदाच मुंबईने लखनऊचा पराभव केला आहे. हा मुंबईचा 10 सामन्यांतील सहावा विजय आहे. यासह, मुंबई आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सने प्रथम खेळल्यानंतर 20 षटकांत 215 धावा केल्या. प्रत्युत्तरात, लखनऊचा संघ फक्त 161 धावा करू शकला. लखनऊचा हा 10 सामन्यांतील पाचवा पराभव आहे. लखनऊचा संघ आता गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 54 धावा आणि रायन रिकेल्टनने 32 चेंडूत 58 धावा केल्या. शेवटी, नमन धीर 11 चेंडूत 25 धावा काढून नाबाद परतला. पदार्पण करणाऱ्या कॉर्बिन बॉशने 10 चेंडूत 20 धावा केल्या. विल जॅक्सनेही फलंदाजी करताना 29 धावा केल्या.
मुंबईने दिलेल्या 216 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तरात, लखनऊची सुरुवात चांगली झाली नाही. एडेन मार्कराम फक्त 9 धावा करू शकला. त्यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी जलद धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये, लखनऊने एका विकेटच्या मोबदल्यात 60 धावा केल्या, परंतु त्यानंतर संघाने आपली लय गमावली सतत विकेट्स गमावल्या.
मिशेल मार्श 24 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. तर विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन 15 चेंडूत 27 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार ठोकले. पण पुन्हा एकदा कर्णधार रिषभ पंतची बॅट शांत राहिली. तो फक्त 4 धावा करू शकला. आयुष बदोनीने 22 चेंडूत 35 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार ठोकले. डेव्हिड मिलर 16 चेंडूत फक्त 24 धावा करू शकला. अब्दुल समदही स्वस्तात बाद झाला. तो 2 धावा काढून बाद झाला.
मुंबईकडून जसप्रीत बुमराहने दमदार कामगिरी केली. बुमराहने एडेन मार्कराम तसेच विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरला महत्वाच्या वेळी पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बुमराहच्या या उत्कृष्ट खेळीमुळे मुंबईला सहज विजय मिळवण्यात यश आले. त्याने 4 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. विल जॅक्सने 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्टने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
Just Bumrah things ????
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
A yorker masterclass from Jasprit Bumrah rattled the #LSG batters ????
Updates ▶ https://t.co/R9Pol9Id6m #TATAIPL | #MIvLSG | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/LKpj6UATZD
????????????????. ????????????. ???????????????? ✅@mipaltan make it 5⃣ in 5⃣ and are marching upwards and onwards in the season ????
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
Scorecard ▶ https://t.co/R9Pol9Id6m #TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/zW7EuWhU7j





