---Advertisement---

मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स संघात झाली या खेळाडूंची अदला-बदली

On: गुरूवार, ऑगस्ट 1, 2019 3:20 PM
---Advertisement---

आयपीएलचा 13 वा मोसम सुरु होण्यासाठी अजून जवळ जवळ 9 महिने बाकी आहेत. पण या मोसमासाठी संघांनी तयारी सुरु केली आहे. या मोसमासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघानी त्यांच्या प्रत्येकी एका खेळाडूची आदला बदली (प्लेअर ट्रान्सफर) केली आहे.

मुंबईने फिरकीपटू मयंक मार्कंडेचे तर दिल्लीने अष्टपैलू खेळाडू शेरफान रुदरफोर्डचे ट्रान्सफर केले आहे. त्यामुळे आता 2020च्या आयपीएल मोसमात मार्कंडे दिल्लीकडून तर रुदरफोर्ड मुंबईकडून खेळताना दिसणार आहे.

मार्कंडेच्या ट्रान्सफरबद्दल मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी म्हणाले, ‘आम्ही मयंकला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. त्याच्याकडे चांगली क्षमता आहे आणि आम्ही नशीबवान होतो की अशी प्रतिभा आम्ही शोधली आणि त्याचे लवकर पोषण केले.’

‘आमच्यासाठी हा कठिण निर्णय होता. पण आम्ही त्याला मुक्त करत आहोत. तो भारतीय क्रिकेटमधील आणखी एक चमकता तारा म्हणून उदयास येत आहे, हे आम्हाला माहित आहे. तो मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाचा नेहमीच भाग असेल.’

मार्कंडेने 2018 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. या मोसमात त्याने शानदार कामगिरी करताना 14 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या. मात्र 2019 च्या मोसमात त्याला 3 सामन्यातच खेळण्याची संधी मिळाली. या तीन सामन्यात त्याला केवळ 1 विकेट घेण्यात यश आले.

त्याच्या बदल्यात 2020 आयपीएलसाठी मुंबईने दिल्लीकडून घेतलेला अष्टपैलू खेळाडू रुदरफोर्डने 2019 च्या मोसमात आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या मोसमात 7 सामन्यात खेळताना 73 धावा केल्या आणि 1 विकेट घेतली आहे.

त्याच्याबद्दल अंबानी म्हणाले, ‘आमच्या कुटुंबात प्रतिभाशाली शेरफान रुदरफोर्डचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. त्याने आम्हाला त्याच्या अष्टपैलू क्षमतेने आणि जिंकण्याच्या दृष्टिकोनाने प्रभावित केले आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याने आपल्या खेळाने जगात ओळख निर्माण केली आहे. आम्हाला विश्वास आहे मुंबई इंडियन्समध्ये त्याला नवे घर मिळेल.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पहिल्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे ११ जणांचा इंग्लंड संघ, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

आजपासून सुरु होणाऱ्या ऍशेसबद्दल सर्वकाही…

क्रिकेटच्या इतिहासात… ऍशेस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment