---Advertisement---

आयपीएल 2023 आधी मुंबईने या खेळाडूंना दिला नारळ; रोहितच्या नेतृत्वात हे 15 शिलेदार कायम

Mumbai-Indians
---Advertisement---

आयपीएल 2023 (IPL 2023) साठी सर्व संघांनी आपापल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने देखील आयपीएलच्या या आगामी हंगामासाठी कायम ठेवलेल्या तसेच करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह 15 खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय मुंबई संघ व्यवस्थापनाने घेतला.

https://twitter.com/mipaltan/status/1592501981700296704?t=kV0c9TgfOHq3SPGDA3hD1w&s=19

 

आयपीएल 2023 साठी खेळाडू रिटेन करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर होती. सर्व संघांनी आपापल्या कायम ठेवलेल्या व करार मुक्त केलेल्या खेळाडूंची नावे घोषित करताना अनेक आश्चर्याचे धक्के दिले. पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या मुंबईने 15 खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कर्णधार रोहित शर्मासह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव व इशान किशन या भारतीय संघात खेळणारे खेळाडूंचा समावेश आहे. तर मागील वर्षी दुखापतीमुळे आयपीएलला मुकलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, ऑस्ट्रेलियाचा टीम डेव्हिड यांच्यासह दक्षिण आफ्रिकेचे युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस व ट्रिस्टन स्टब्स हे विदेशी खेळाडू देखील पुढील हंगामात मुंबईसाठी खेळताना दिसतील.

https://twitter.com/mipaltan/status/1592497280023924737?t=CuZy3hHLugCle4sn3pwI6g&s=19

 

मुंबईने करारमुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये कायरन पोलार्ड याचे प्रमुख नाव आहे. पोलार्डने निवृत्ती घेतल्याने तो पुढील हंगाम खेळणार नाही. मागील हंगामात करोडोंची रक्कम मिळालेले ऑस्ट्रेलियाचे डॅनियल सॅम्स व रायले मेरिडीथ हे देखील पुढील हंगामात मुंबईचा भाग नसतील. भारताकडून खेळलेले मयंक मार्कंडेय आणि जयदेव उनाडकत यांना देखील मुंबईने करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेले खेळाडू-

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, अर्शद खान, आकाश मधवाल, ऋतिक शौकीन, कुमार कार्तिकेय, टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, जेसन बेहरेनडॉर्फ, जोफ्रा आर्चर.

मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलेले खेळाडू-

कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, रायली मेरेडिथ, फॅबियन ऍलेन, टायमल मिल्स, मयंक मार्कंडेय, जयदेव उनाडकत, आर्यन जुयाल, एम अश्विन, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग व बसील थंपी.

(Mumbai Indians Retained And Released Players For IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी कर्णधार हार्दिक करतोय एन्जॉय! शर्टलेस फोटो झाले व्हायरल
संघाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी बीसीसीआयची धडपड, भारताच्या टी20मध्ये धोनीला मिळू शकते मोठी भूमिका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---