---Advertisement---

Video: मुंबई इंडियन्सची नवी ‘आपली जर्सी’ पाहिली का? लई भारी दिसतेय

On: शनिवार, मार्च 12, 2022 3:04 PM
Mumbai-Indians-New-Jersey
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL 2022) हंगामाला येत्या २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे २ आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिलेल्या या स्पर्धेसाठीची आतुरता सर्व संघामध्ये पाहायला मिळत आहे. नुकतेच संघांनी त्यांच्या नव्या जर्सींचे (Mumbai Indians New Jersey) अनावरण करण्यास सुरुवात केली आहे. आता यात ५ वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चाही समावेश झाला आहे. मुंबईने शनिवारी (१२ मार्च) त्यांच्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.

मुंबई इंडियन्सच्या नव्या जर्सीचे अनावरण
मुंबई इंडियन्स संघाच्या नव्या जर्सीचा पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई संघानेही त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर जर्सीचा व्हिडिओही शेअर केला आहे. मुंबईच्या नव्या जर्सीत काही बदल करण्यात आले आहेत. यावेळी मुंबईच्या जर्सीवर खेळाडूंची नावे आणि त्यांचे जर्सी क्रमांक पिवळ्या रंगात लिहिली जाणार आहेत. इतरत्र मुंबई संघाचा निळा रंगच असेल. फक्त त्यावर गडद आणि फिक्या निळ्या रंगांचे स्लाइस दिले गेले आहेत.

नवीन जर्सीच्या अनावरणाचा एक खास व्हिडिओ मुंबई इंडियन्सने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मुंबईचा रंग, चिन्ह आणि अभिमान. आयपीएल २०२२ साठी सादर करत आहोत मुंबई इंडियन्सची नवी जर्सी.’

२७ मार्चला खेळणार पहिला सामना
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२२ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. मुंबईचा संघ २७ मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांचा हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात त्यांचा प्रतिस्पर्धी दिल्ली कॅपिटल्स संघ असेल.

मुंबई इंडियन्स –
उर्वरित किंमत – १० लाख
संघातील खेळाडू – २५ (परदेशी ८)
संघ – रोहित शर्मा (कर्णधार), कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बासिल थंपी, एम अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टिळक वर्मा, संजय यादव, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन ऍलन

महत्त्वाच्या बातम्या-

Ind v SL : निर्णायक कसोटीत रोहितने टॉस जिंकला, प्रथम बॅटींगचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

गेल्या ५ वर्षात झाल्या १८ दिवस-रात्र कसोटी, टीम इंडिया मायदेशात राहिलीय अजेय; मग बंगळुरूमध्ये काय होणार?

वेस्ट इंडीजला विजयाच्या हॅट्रिकपासून रोखले, टीम इंडियाचा मोठ्ठा विजय; हरमनप्रीत-मंधाना विजयाचे शिल्पकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---