सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आयपीयल फ्रेंचाइजी मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक पोलिस कर्मचारी गोलंदाजी करताना दिसत आहे. पोलीस आपला वेग आणि उत्कृष्ट रेषा आणि लांबीच्या जोरावर फलंदाजाला बोल्ट करत आहे. मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
एका पोलिस कर्मचाऱ्याचे गोलंदाजीचे कौशल्य पाहून सोशल मीडियावर क्रिकेट चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते या व्हिडिओवर सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला मुंबई इंडियन्सने एक मजेदार कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हॅलो, आम्हाला धोकादायक स्पीडविरोधात तक्रार नोंदवायची आहे.” सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोलिसाचे नाव दुर्जन हरसानी (Durjan Harsani) आहे. दुर्जन हरसानी पोलिसांच्या गणवेशात आपल्या उत्कृष्ट गोलंदाजी कौशल्याचे दाखवत आहे.
'Hello 1️⃣0️⃣0️⃣, we'd like to report a case of 𝐟𝐢𝐞𝐫𝐲 𝐩𝐚𝐜𝐞' 🔥
📽️: Durjan Harsani#OneFamily #MumbaiIndians #MumbaiMeriJaan pic.twitter.com/mKT9QPbO1p
— Mumbai Indians (@mipaltan) August 10, 2023
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व्हिडिओ
मुंबई इंडियन्सने 10 ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. त्याचबरोबर हा व्हिडिओ आतापर्यंत ४.९ लाखांच्यावर लोकांनी पाहिला आहे. यासोबतच प्रेक्षकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की या पोलिसाकडे उत्कृष्ट गोलंदाजी कौशल्याव्यतिरिक्त वेग आहे. यामुळे, फलंदाज पुन्हा पुन्हा चकमा देत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याचा परिणाम
दरम्यान भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध शनिवारी (12 ऑगस्ट) चौथ्या टी20 सामन्यात पराभूत केले. भारतीय संघाने पाच टी20 सामन्याच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे. पहिली फलंदाजी करत वेस्ट इंडिजने 20 षटकांत 8 गडी गमावून 178 धावांचे लक्ष उभा केले. प्रत्युउत्तर भारतीय संघाने 17 षटकांत केवळ 1 विकेट गमावून 179 धावांचा पल्ला गाठाला. दरम्यान भारतीय संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने 51 चेंडूत 83* धावा केल्या. तर शुभमन गिल 47 चेंडूत 77 धावा करून बाद झाला. (mumbai indians share on social media policenman bowing video)
महत्वाच्या बातम्या-
WIvIND: कोण ठरणार टी20 मालिकेचा विजेता? फ्लोरिडात आज रंगणार ‘ग्रॅंड फिनाले’
‘मी शाहीन सारखा गोलंदाज पाहिला नाही’, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य