आयपीएलचा भारतात आयोजित करण्यात आलेला चौदावा हंगाम कोरोना प्रादुर्भावामुळे मध्यातच स्थगित करावा लागला होता. त्यानंतर उर्वरित सामने कधी होणार, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता होतील. आज (शनिवारी) अखेर बीसीसीआयने निर्णय जाहीर करत उर्वरित आयपीएल हंगाम संयुक्त अरब अमिरातीत अर्थात युएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात हे सामने खेळवण्यात येणार आहेत.
हा निर्णय जाहीर झाल्यानंतर साहजिकच चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले. तर चाहत्यांशिवाय आयपीएलचे संघही आनंदित झाल्याचे दिसले. ट्विट करत त्यांनी आपला हा आनंद व्यक्त केला. यातील मुंबई इंडियन्सचे मजेशीर ट्विट आता व्हायरल होते आहे.
रोहित शर्मा ब्रेकिंग न्यूज ऐकताच तयार?
बीसीसीआयने शनिवारी आयपीएलचा हंगाम परतणार असल्याची घोषणा केली. ही घोषणा होताच आयपीएल मधील एक लोकप्रिय आणि यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली. यात मागील वर्षीचा मुंबई इंडियन्सच्या संघाचा विजेतेपद पटकावलेला फोटो होता. मागील वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल मध्येच मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले होते. हाच संदर्भ देत मुंबईने हा फोटो शेअर केला. आणि त्यावर ‘युएई, आम्ही परत येत आहोत’, अशी कॅप्शन पण दिली. यावर चाहत्यांनी पण विविध प्रतिक्रियांचा पाऊस पाडला.
UAE, we are coming back! 🇦🇪#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 pic.twitter.com/M5iCXgZaMi
— Mumbai Indians (@mipaltan) May 29, 2021
एका चाहत्याने प्रतिक्रिया देतांना रोहित शर्माचा फोटो पोस्ट केला. या फोटोत रोहित शर्मा आपल्या बुटाची लेस बांधताना दिसून येतो आहे. चाहत्याने यात युक्ती लढवत फोटोत टीव्हीवर ‘आयपीएल आयोजन युएईमध्ये होणार’, अशी ब्रेकिंग न्यूज दिसते आहे. अर्थातच फोटोशॉप केलेला हा फोटो आहे. मुंबई इंडियन्सने हे ट्विट शेअर केले असून त्यावर ‘सगळे तयार आहेत’, अशी कॅप्शन दिली आहे.
All set 💪🏻💙#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 https://t.co/DPx5jxZdyM
— Mumbai Indians (@mipaltan) May 29, 2021
कोरोनामुळे हंगाम झाला होता स्थगित
आयपीएल २०२१च्या हंगामाचे आयोजन भारतात करण्यात आले होते. मात्र आयपीएलच्या मध्यात खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे २९ सामने झाले असतांना बीसीसीआयने हा हंगाम स्थगित केला होता. आता युएईचा पर्याय मिळाल्याने उर्वरित ३१ सामने खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कमिन्सने निवडली वर्ल्ड टेस्ट इलेव्हन; भारताच्या या चार खेळाडूंना मिळाले स्थान
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मिळाला नवा सलामीवीर, ७३ ची आहे सरासरी
बीसीसीआयने टी२० विश्वचषकाबाबत निर्णय घेण्यासाठी मागितला एक महिन्याचा अवधी, ‘हे’ आहे कारण