आज(९ मे) जगभरात मातृदिन साजरा केला जात आहे. दरवर्षी मे महिन्यातील दुसरा दिवस हा मातृदिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेकजण विविधप्रकारे आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करत असतात. सोशल मीडियावर आईबरोबरी फोटो, व्हिडिओ शेअर करत तिच्या आठवणींना उजाळा देत असतात. याच मातृदिनाच्या निमित्ताने आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्सने इंस्टाग्रामवर असाच एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक त्यांचा मुलगा अगस्त्यबरोबर खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ आयपीएल २०२१ दरम्यानचा आहे. यात दिसते की नताशा अगस्त्यबरोबर मस्ती करत असताना हार्दिकही तिथे येतो आणि मुलागा कडेवर घेतो. थोडावर मस्ती केल्यानंतर तो पुन्हा मुलागा नताशाजवळ सोपवतो. तसेच या व्हिडिओमध्ये सुर्यकुमार यादव देखील अगस्त्यसह मस्ती करताना दिसत आहे.
विशेष म्हणजे या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला मुंबई इंडियन्सने ‘आई मला खेळायला जायचं, जाऊ दे नं व’ हे प्रसिद्ध ‘नाळ’ या मराठी चित्रपटातील गाणे वाजवले आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मुंबई इंडियन्सने ‘To all the आईs…Happy Mother’s Day (सर्व आयांना मातृदिनाच्या शुभेच्छा)’, असे लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘आई’ हा शब्द मराठीत लिहिला आहे.
https://www.instagram.com/p/COpA9AnDYs8/
मातृदिनाच्या निमित्ताने अनेक क्रिकेटपटूंनीही आपल्या आईबरोबरील फोटो शेअर केले आहेत. हार्दिकनेही त्याची आणि त्याची पत्नीबरोबरील फोटो शेअर केला आहे. त्याने या फोटोंना कॅप्शन देताना लिहिले आहे की ‘माझ्या दोन क्वीन्स. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो.’
https://www.instagram.com/p/COpzRAiFnJU/
हार्दिकला मिळाले नाही इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान
काहीदिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड दौऱ्यासाठी २० जणांचा भारतीय संघ जाहीर केला आहे. तसेच ४ राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे. या संघात हार्दिकला संधी मिळालेली नाही. हार्दिक सध्या गोलंदाजी करताना दिसत नाही. त्यामुळे कदाचित त्याला वगळण्याचा निर्णय घेतलेला असावा.
या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –