इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्रत्येक संघ गुणतालिकेत पहिल्या 4 संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याचदा 7 किंवा 8 सामने एखाद्या संघाने जिंकल्यानंतर म्हणजेच 14 किंवा 16 गुणांसह तो संघ प्लेऑफमधील स्थान निश्चित करतो. मात्र या हंगामात 16 गुण मिळवूनही प्ले ऑफमध्ये स्थान मिळेल का, याची खात्री संघांना नाही. कारण, या हंगामातील उर्वरित सामन्यांचा विचार करता प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी समीकरण अधिक अवघड झालं आहे.
मुंबईचे आहेत 16 गुण
मुंबई इंडियन्सने बुधवारी (28 ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 5 गडी राखून पराभव केला. हा मुंबईचा या हंगामातील 8 वा विजय होता. त्यामुळे मुंबईचे गुणतालिकेत 16 गुण झाले आहेत. या हंगामातील उर्वरित सामन्यांचा विचार करता आणखी चार संघ गुणतालिकेत 16 गुण घेऊ शकतात. अशा परिस्थितीत कोणते चार संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवतील हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
मुंबई वगळता चार संघांकडे आहे संधी
गुणतालिकेत मुंबई सध्या 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. किंग्स इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचा शर्यतीत आघाडीवर आहेत. या सर्व संघांनी 12 सामने खेळले आहेत. त्यामुळे चारही संघांकडे 16 गुण मिळवण्याची संधी आहे.
असे असेल समीकरण
• बेंगलोरचे गुणतालिकेत 14 गुण आहेत. एक सामना जिंकून ते 16 गुण मिळवू शकतात. या संघाला दिल्ली आणि हैदराबादशी उर्वरित सामने खेळायचे आहे. जर संघाचा दिल्लीकडून पराभव झाला आणि त्यांनी हैदराबादला पराभूत केले तर ते 16 गुणांवर गुणांपर्यंत पोहोचेल.
• दिल्लीला बेंगलोर आणि मुंबईशी सामना करावा लागेल. म्हणजे बेंगळुरू किंवा मुंबई या दोन्हीपैकी एकाला पराभूत करून दिल्ली 16 गुण गाठू शकतो.
• पंजाबचे या हंगामात 12 गुण आहेत. या संघाला पुढील सामने चेन्नई आणि राजस्थान यांच्याशी खेळावे लागेल. दोन्ही सामने जिंकल्यानंतर पंजाबचेही 16 गुण होतील.
• कोलकाताचे 12 गुण आहेत. चेन्नई आणि राजस्थान यांच्याशी खेळलेला कोलकाताचा सामना होईल. कोलकाताने जर दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळविला तर त्यांचेही 16 गुण होतील.
त्यामुळे प्लेऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी या चारही संघांना पुढील त्यांचे उर्वरित 2 सामने फार महत्त्वाचे ठरणार आहेत. जर कोलकाता किंवा पंजाबने 1 सामनाही पराभूत झाला तरी मुंबई प्लेऑफला पात्र ठरेल. तसेच दिल्ली आणि बेंगलोरही केवळ 1 विजय मिळवून प्लेऑफमधील स्थान मिळवतील. मात्र असे झाले तर हैदराबाद आणि राजस्थान यांच्या आशा पल्लवित होती. कारण त्यांना जास्तीत जास्त 14 गुण मिळवता येणार आहेत. जर पंजाब आणि कोलकाता त्यांच्या पुढील उर्वरित २ सामन्यात पराभूत झाले तर हैदराबाद आणि राजस्थानलाही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. त्यामुळे सध्या ७ संघ प्लेऑफसाठी स्पर्धा करत आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
..तर 16 गुण मिळवूनही संघाला बाहेर पडावे लागेल.
वर उल्लेख केलेल्या समीकरणाचा विचार केला, तर 5 संघ 16 गुणांवर पोहोचू शकतात. अशा परिस्थितीत ज्या संघाचा नेट रन रेट अधिक असेल तेच चार संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवतील. नेट रन रेटमध्येही मुंबईने अव्वल स्थान मिळविले आहे. म्हणूनच मुंबईचे प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्के आहे. परंतु 16 गुणांपर्यंत पोहोचणार्या उर्वरित चार संघांपैकी एका संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
दुखापतग्रस्त असूनही रोहित स्टेडियममध्ये कसा? माजी क्रिकेटपटूने उपस्थित केला प्रश्न
“सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या फ्लाइटमध्ये असायला हवे”
IPL 2020:… म्हणून हार्दिक पंड्या आणि ख्रिस मॉरिसला मॅच रेफ्रीने दिला इशारा, पाहा व्हिडीओ