बुधवारी (दि. 3 मे) पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023चा 46 वा सामना पार पडला. या सामन्यात पंजाबने 20 षटकात 214 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात मुंबईने 18.5 षटकात 216 धावा ठोकत सामना संपवला. या सामन्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग चांगलाच महागड ठरला. विशेष करून तिलक वर्माने त्याच्याविरुद्ध जबरदस्त आक्रमक खेळ दाखवत मागील सामन्यातील पराभवाचे उट्टे काढले.
उभय संघांमध्ये अकरा दिवसांपूर्वी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला होता. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात मुंबईला निसटता पराभव पत्करावा लागलेला. या सामन्यात अर्शदीपने अखेरच्या षटकात तिलक वर्मा व नेहल वढेरा यांचा त्रिफळा उडवताना स्टम्प्स मोडले होते. त्या गोलंदाजीचा यावेळी तिलकने बदला घेतला. अर्शदीपने टाकलेल्या 17 व्या षटकात तिलकने 1 चौकार व 2 षटकार लगावले होते. त्यानंतर 19 व्या षटकात विजयी षटकार देखील तिलकने अर्शदीपलाच लगावला.
अर्शदीप या सामन्यात बरीच महागडी गोलंदाजी करताना दिसला. त्याने टाकलेल्या 3.5 षटकात तब्बल 66 धावा काढल्या गेल्या. यामध्ये तो केवळ एकच बळी मिळवू शकला. आयपीएलमध्ये त्याची ही सर्वात खराब गोलंदाजी ठरली. तसेच, 4 पेक्षा कमी षटकांमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा लाजिरवाणा विश्वविक्रमही त्याच्या नावे नोंद झाला.
या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना लियाम लिव्हिंगस्टोन (नाबाद 82) आणि जितेश शर्मा (नाबाद 49) यांच्या खेळीच्या जोरावर 3 विकेट्स गमावत 214 धावा केल्या होत्या. यावेळी मुंबईकडून पीयुष चावलाने 2, तर अर्शद खानने 1 विकेट घेतली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने ईशान किशन (75), सूर्यकुमार यादव (66), तिलक वर्मा (नाबाद 26) आणि टीम डेविड (नाबाद 19) यांच्या जोरावर 18.5 षटकात 216 धावा केल्या. तसेच 6 विकेट्सने सामना जिंकला.
(Mumbai Indians Tilak Varma Payback From Punjab Kings Arshdeep Singh After Stumps Breaking Bowling)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितला ट्रोल करणाऱ्या पंजाबला मुंबईने दाखवला इंगा; ओढवली ट्वीट डिलीट करण्याची नामुष्की
‘हेच दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी मेडल जिंकले होते?’, पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत रडली कुस्तीपटू