मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे २ आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिलेल्या या स्पर्धेसाठीची आतुरता सर्व संघामध्ये पाहायला मिळत आहे. नुकतेच संघांनी त्यांच्या नव्या जर्सींचे अनावरण करण्यास सुरुवात केली आहे. आता यात ५ वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचाही समावेश आहे. मुंबईने शनिवारी (२७ मार्च) त्यांच्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.
नवीन जर्सीच्या अनावरणाचा एक खास व्हिडिओ मुंबई इंडियन्सने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह असे काही स्टार खेळाडू दिसत आहेत. तसेच या जर्सीच्या शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे की ‘वन टीम, वन फॅमिली, वन जर्सी. आयपीएल २०२१ साठी सादर करत आहोत मुंबई इंडियन्सची नवी जर्सी.’
या व्हिडिओमध्ये चाहत्यांचे कौतुकही करण्यात आले आहे. तसेच शेवटी म्हटले आहे की, ‘ते काय आहे ना, वन फॅमिलीची गोष्टच वेगळी आहे.’
तसेच या नव्या जर्सीबद्दल मुंबई इंडियन्सने माहिती दिली आहे की ही जर्सी शंतनू आणि निखिल या प्रसिद्ध फॅशन डिझायनरने डिझाईन केली आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु आणि आकाश या पंचभूतांचे प्रतिनिधित्व केले जाईल अशी जर्सीची रचना करण्यात आली आहे.
One Team. #OneFamily. One Jersey. ????
Presenting our new MI jersey for #IPL2021 ????✨
Paltan, pre-order yours from @thesouledstore now – https://t.co/Oo7qj5m4cN#MumbaiIndians pic.twitter.com/F0tBT6TXcq
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2021
मुंबई इंडियन्सची नवी जर्सी नेहमीप्रमाणे गडद निळ्या रंगामध्येच आहे. तसेच या जर्साच्या खांद्यावर आणि कंबरेच्या बाजूला सोनेरी रंगाची डिझाईन आहे. तसेच हाताच्या खालच्या बाजूला आणि कॉलरच्या खालच्या बाजूला केशरी रंगाची बॉर्डर आहे.
We will take the field in #IPL2021 wearing our colours with pride! ????✨
???? पलटन, तयार का? ????
Pre-order – https://t.co/Oo7qj5m4cN#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/2sXlDg97XQ
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2021
मुंबईच्या मोहिमेला चेन्नईपासून सुरुवात
आयपीएल २०२१ चे आयोजन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने ते थोडे वेगळ्याप्रकारे करण्यात आले आहे. यंदा कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक संघ साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळाच प्रवास करेल अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही संघ यंदा आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.
त्यामुळे मुंबई इंडियन्यची आयपीएल २०२१ची मोहिम यंदा चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममधून सुरु होईल. मुंबईला पहिले ५ सामने चेन्नईमध्ये खेळायचे आहे. मुंबईचा पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध ९ एप्रिलला होईल.
असा आहे मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२१ साठी संघ –
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (यष्टीरक्षक), किरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान, नेथन कुल्टर नाईल, ऍडम मिल्ने, पियुष चावला, जेम्स निशम, युधविर चरक, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडूलकर
असे आहेत आयपीएल २०२१ मधील मुंबई इंडियन्सचे साखळी फेरीतील सामने –
९ एप्रिल – चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ एप्रिल – चेन्नई, केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ एप्रिल- चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२० एप्रिल- चेन्नई, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ एप्रिल – चेन्नई, पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२९ एप्रिल – दिल्ली, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी ३.३० वाजता
१ मे – दिल्ली, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
४ मे – दिल्ली, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे – दिल्ली, राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१० मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, दुपारी ३.३० वाजता
१६ मे – बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२० मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
महत्त्वाच्या बातम्या –
विराटने ४ वर्षांपूर्वी त्याला ‘किंग कोहली’ का म्हणतात याच प्रात्यक्षिक दिलं होतं, पाहा व्हिडिओ
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २७ वर्षांपुर्वी ‘या’ खेळाडूने केले होते ओपनर
रिषभचा चेंडू सीमापार जाऊनही चौकार नाही, विश्वचषकात असं झालं असतं तर? भारतीय दिग्गज संतापला






